पारनेर : पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणारे पांडूरंग महादेव तथा सेनापती बापट यांच्या शहरातील स्मारकाचे नूतनीकरणासाठी पुरातत्व विभागाकडून मुंबईतील एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. काल आमदार नीलेश लंके व एजन्सीच्या प्रतिनिधींनी स्मारकाची पाहणी करून प्रस्तावित आराखडयासंदर्भात माहिती घेतली. याच आठवडयात सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडे आमदार लंके यांनी स्मारकाच्या नूतनीकरणासंदर्भात निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
मंत्री मुनगंटीवार यांनी तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात पत्र देत नूतनीकरणास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. आमदार लंके यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या स्मारकाच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधले असता, मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुरातत्व विभागाने नूतनीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी मुंबईतील शरयू मोरे असोसिएटस या खासगी एजन्सीकडे काम सोपविले. शरयू मोरे व शशांक सावंत यांनी शनिवारी सकाळी पारनेर येथे येत स्मारकाची पाहणी केली.
सेनापती बापट यांचे जन्मस्थळ, त्यालगत बांधलेेल्या स्मारकाची पाहणी केल्यानंतर जन्मस्थळ आहे त्याच पद्धतीने नुतनीकरण करण्यात येईल. छताला जे लाकूड आहे, तसेच पुन्हा बसविण्यात येणार असून भिंतीही पुर्वीप्रमाणेच नूतनीकरण करून त्याचे पुरातत्व जपले जाईल, असे शरयू मोरे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, विजय डोळ, बबन शेख, बाळासाहेब नगरे, भूषण शेलार, चंदन भळगट, वैभव गायकवाड, संदीप चौधरी, कारभारी पोटघन, भाऊ गांधी, आर.आर.राजदेव, गणेश साळवे, भाऊसाहेब फंड, रमीज राजे, सुनील कावरे, रमेश गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
निधीची चिंता करू नका
नव्याने आराखडा तयार करताना शरयू मोरे यांनी निधीची चिंता करू नये. हे स्मारक आगळे वेगळे होईल, यासाठी जे काही करता येईल ते त्यांनी आराखडयामध्ये करावे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली राहील, असे आमदार लंके यांनी सांगितले.
हेही वाचा :