अहमदनगर

संगमनेर : वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू

अमृता चौगुले

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे तालुक्यात रविवार अपघातवार झाला आहे पहिल्या घटनेमध्ये संगमनेर तालुक्या तील निळवंडे गावाजवळ अनुकूल सत्यवान मेंढे (वय 21, रा. देवी गल्ली) संगमनेर हा तरुण गुरुपौर्णिमेनिमित्ताने शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनाला चालला होता. तो निळवंडे जवळील रस्त्यावर मित्रांसमवेत रस्त्याच्या कडेला उभा असताना अज्ञात एका वाहनाने त्याला जोराची धडक दिली असता झालेल्या भीषण अपघातात तो गंभीरत्या जखमी झाला.

त्याला जखमी अवस्थेत घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍याने तो मयत झाला असल्याचे घोषित केले व त्याचे दोन मित्रही जखमी झाले आहे. दुसरी घटनेत कोल्हार घोटी राज्य मार्गावर वडगावपान शिवारातील बंद पडलेल्या टोल नाक्यावर जवळ घडली. अमोल गजानन सानप (वय 30, रा. कर्‍हे, ता. संगमनेर ) वडगावपानकडे येत असताना एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली असता झालेल्या भीषण अपघातात सानप याचा जागीच मृत्यू झाला. या प्रक रणी मेडीकव्हर हॉस्पिटलने खबर दिल्यानंतर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

तिसर्‍या घटनेत संगमनेर तालुक्यातील जवळे कडलक येथील शशिकांत प्रभू हांडे यांच्या शेतातील विहिरीवर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह पाण्याबाहेर काढला असता या मयत महिलेची ओळख पटली असून तीचे नाव ज्योती संतोष पाटेकर (वय 38, रा. आरेगाव, ता. कराड, जि. सातारा) असे निष्पन्न झाले. या प्रकरणी तालुका पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे

चौथ्या घटनेमध्ये संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे काल रविवारी दुपारी 1 वाजता संदिप सोमनाथ डुंबरे (वय 38, धंदा शेती, रा. पेमगिरी) यांच्या मालकीच्या शेततळ्यात पुष्पा उत्तम डुबे (42, रा. पेमगिरी) ही महिला पाय घसरून शेततळ्यातील पाण्यात पडली असता तिचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी मृत्यूची नोंद झाली आहे.

पाचव्या घटनेत तालुक्यातील निमगांव टेंभी येथील आश्वीन बाबुराव वर्पे (वय 28, रा. निमगाव टेंभी) या तरूणाने आपल्या राहत्या घरात छताला असलेल्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यास उपचारासाठी शहरातील कुटे हॉस्पिटल येथे आणण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मयत घोषीत केले.

या पाचही दुर्दैवी घडलेल्या घटनांबाबत संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलिस उपाधिक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक दिघे, पो. हेड. कॉ. एम.आर. सहाणे, हेड कॉ. वायाळ, हेड कॉ. एस. आर बढे, सहाय्यक फौजदार सय्यद आदिंसह कर्मचारी करत आहे.

संगमनेरात अपघातांचे प्रमाण वाढले

गेल्या काही महिन्यांपासून संगनमेर परिसरात अपघांचे प्रमाण वाढलेले आहे. सर्वात जास्त अपघात नाशिक-पुणे मार्गावर होत आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने रस्त्यावरून वाहने वेगाने जात असल्याने हे अपघात होत आहे. संगमनेर तालुका भौगोलिकद़ृष्ट्या मोठा असल्याने पोलिस प्रत्येक ठिकाणी तत्काळ पोहचू शकत नसल्याने चोरी तसेच इतर गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT