अहमदनगर

पोळ्यानिमित्त आज कान्हूरपठारला मिरवणूक

अमृता चौगुले

कान्हूरपठार : पुढारी वृत्तसेवा :  पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथे आज (दि.14) श्रावणी बैलपोळा व शुक्रवार (दि.15) गौराईचा यात्रोत्सव साजरा होत आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. असे असले तरी गावाची परंपरा जपण्यासाठी बैलपोळ्याचे ग्रामस्थांनी नियोजन केले आहे. गुरुवारी सजविलेल्या बैलांच्या मिरवणुका काढण्यात येणार असून, शुक्रवारी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी गौराईची यात्रा व कुस्त्यांच्या जंगी आखाड्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

बैलपोळ्याचा सण ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करतात. श्रावणी बेलपोळ्याच्या दिवशी संध्याकाळी मानाच्या बैलांच्या मिरवणुकीनंतर निघणार्‍या इतर शेतकर्‍यांच्या बैलांच्या मिरवणुका, फटाक्यांची जोरदार आतषबाजी, हौशी शेतकर्‍यांच्या बैलांपुढे नाचणार्‍या नृत्यांगना या मिरवणुकीचे आकर्षण असते. कान्हूरपठारला पोळ्याची व गौराई यात्रेची जुनी परंपरा आहे. शांतता व कायदा सुव्यवस्थेचे पालन करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या बैठकीत केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT