अहमदनगर

दुर्दैवी ! बसच्या चाकाखाली सापडून महिला प्रवाशी जागीच ठार

अमृता चौगुले

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा :  बसमध्ये चढताना तोल गेल्याने चाकाखाली सापडून एक महिला जागीच ठार झाली. संगमनेर बस स्थानकात आज गुरूवार (दि. 10) रोजी दुपारी ही हृदय पिळवटणारा थरार घडल्याने हळ-हळ व्यक्त होत आहे. आयशा बेग (वय 55 वर्षे, रा. संगमनेर खुर्द) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सिन्नर एसटी डेपोची नाशिक- नगर बस (क्रमांक एम एच 20 बी एल 4056) गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास संगमनेर बस स्थानकात आली. बस पुन्हा अ. नगरकडे जाण्यास निघाली असता बसमध्ये आयशा मुनी बेग ही महिला चढत होती, मात्र अचानक बस सुरू झाल्याने चढताना महिलेचा तोल गेल्याने ती चाकाखाली सापडून जागीच ठार झाली.

आजूबाजूच्या नागरिकांनी ही दुर्घटना पहाताच आरडा- ओरड केल्याने चालकाला महिला बसच्या चाकाखाली गेल्याची घटना लक्षात आली. बसभोवती प्रवाशी नागरिक, पोलिस व बस कर्मचारी गोळा झाले. या अपघातामुळे चालक घाबरला. तो बसस्थानकात पळाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रूग्णवाहिका बोलावून मृतदेह रुग्णालयात हलविला. याबाबत संगमनेर शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगमनेर बसस्थानक नेहमी गजबजलेले असते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते, मात्र सुरक्षा व्यवस्थेचा अक्षरशःबोजवारा उडाला आहे. पोलिसांसह खासगी सुरक्षा रक्षक असताना ही दुर्घटना घडली. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या काहीच उपाय योजना केल्या जात नाही. टारगट तरुण, टवाळखोर, भामटे,चोरट्यांचा त्रास प्रवाशांना होतो.

बसस्थानकातील पोलिस मोबाईलमध्येच व्यस्त !
संगमनेर बसस्थानकामध्ये चोरीच्या घटना वाढल्याने पोलिस नेमण्यात आले, मात्र येथे नेमलेले पोलिस इकडे- तिकडे फिरून मोबाईलवर टाईमपास करतात. काम न करता फक्त कामाचा देखावा करतात, अशी माहिती येथील फेरीवाल्यांसह दुकानदारांनी दिली. बस स्थानक संवेदनशील असल्याने वरिष्ठांनी याबाबत लक्ष घालावे, असा सूर उमटत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT