अहमदनगर

Nagar : लाल कांद्याला 4850 विक्रमी भाव

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवारी (दि.20) लाल व गावरान कांद्याची 36 हजार 476 क्विंटल कांद्याची आवक झाली. आवक कमी असल्याने लाल कांद्याला विक्रमी 4850 रूपये भाव मिळाला.
रब्बी हंगामामुळे सध्या शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. त्यातच शेतकर्‍यांकडील गावरान कांदा संपत आला आहे. शिलक राहिलेल्या कांद्याची बाजारात बाजारात आवक होत आहे. त्यामुळे कालच्या लिलावात एक नंबरच्या गावरान कांद्याला 3800 रुपयांपासून 4300 रुपयांपर्यंत भाव निघाला. नंबर दोनच्या कांद्याची 2400 ते 3800 रुपये, नंबर तीनला1400 रुपये,2400 रुपये भाव मिळाला. नंबर चारचा कांदा 700 रुपयांपासून पुढे विकण्यात आला.

संबंधित बातम्या :

गावरान कांद्याची 34 हजार 498 गोण्या म्हणजे 21 हजार 174 क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्याची 27 हजार 822 गोण्या म्हणजे 15 हजार 302 क्विंटल आवक झाली. एक नंबरचा लाल कांदा 3950 ते 4850 रुपये क्विंटलप्रमाणे विकण्यात आला. नंबर दोनच्या कांद्याची 2750 रुपये ते 3750 रुपये, तर नंबर तीनचा 1800 रुपयांपासून 3750 रुपये, तर नंबर चारचा कांदा 1000 हजार ते 1800 रुपये विकला गेला, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

लाल कांद्याला विक्रमी भाव मिळत असल्याने शेतकरी सुखावले आहेत. मात्र, हा कांदा ठराविक शेतकर्‍यांनी पिकविला आहे. यावर्षीचे कांदा भाव लक्षात घेऊन काही शेतकरी अजूनही लाल कांद्याची लागवड करताना दिसत आहेत.

कांद्याची रोपे वाया जाणार
पावसाच्या भरवशावर अनेक शेतकर्‍यांनी कांदा रोपे टाकली आहेत. मात्र, परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने नगर जिल्ह्याच्या बहुतांश भागातील नद्या-नाले, बंधारे, तलाव कोरडेच आहेत. परिणामी यावर्षी कांद्याची लागवड घटणार असल्याचे चित्र आहे.

SCROLL FOR NEXT