अहमदनगर

मंत्री विखेंच्या हस्ते आज 41 कोटींच्या कामास प्रारंभ

अमृता चौगुले

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे आज रविवारी महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते सुमारे 41 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ होत असल्याचे सरपंच श्रीनाथ थोरात यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात व त्यांच्या समर्थकांनी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणी येथे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मंत्री विखे प्रथमःच वडगावपान गावात येत आहेत.

यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून वडगावपान गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'हर घर नल, हर घर जल' ही जल जीवन मिशनांतर्गत योजना सर्वत्र राबविली.

मंत्री विखे पा. यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 36 कोटी रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत जलजीवनचा शुभारंभ, ग्रामपंचायत अंतर्गत स्व. दत्ताजीराव काशिनाथ मोरे व्यापारी संकुल, वडगावपान, कोल्हेवाडी, समनापूर शिव रस्ता या प्रमुख कामांसह छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भूमिपुजनासह विविध विकास कामांचा शुभारंभ मंत्री विखे पा. यांच्या हस्ते करण्यात येत आहे.

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे, खा. डॉ. सुजय विखे पा. प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमास वडगावपानसह परिसरातील नागरि कांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सरपंच, उपसरपंच, सदस्य व वडगावपान येथील ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT