अहमदनगर

शनैश्वर देवस्थानची 4 लाखांची फसवणूक; गोव्याच्या कारागिराविरुद्ध गुन्हा दाखल

अमृता चौगुले

सोनई(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : श्री शनैश्वर देवस्थानच्या दीपस्तंभावर गोल्ड प्लेटिंगचा कलश बसविण्याचे काम गोवा येथील कारागिराने 4 लाख रुपये आगाऊ रक्कम घेऊनही काम करण्यास टाळाटाळ केल्याने देवस्थानने त्याच्याविरुद्ध शिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. राज्यातील सर्वाधिक 72 फूट उंचीच्या नवग्रह दीपस्तभांचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर सहा फूट उंच व 80 किलो वजनाचा कलश ठेवण्यात येणार होता.

या कामाचे लिलाव होऊन हे काम गोवा येथील कारागिर जगदीश भट (रा. पलवाडा, उसगाव पौडा, गोवा) याला मिळाले. कामास सुरुवात केल्यानंतर अनामतपोटी 4 लाख 28 हजार 017.41 चा धनादेश घेऊनही कळसाचे पुढील काम करण्यास टाळाटाळ केली. देवस्थाने वेळोवेळी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याने त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे देवस्थानचे योगेश वाबळे यांनी शिंगणापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT