अहमदनगर

पारनेरला 29 कोटी रूपयांचा निधी ; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदादांचे गिफ्ट

अमृता चौगुले

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी पारनेर-नगर मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी तब्बल 29 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमदार लंके यांनी त्यांना समर्थन दिले. त्याच दिवशी पवार यांनी आ. लंके यांच्याकडे कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. लंके यांच्याकडून कामांचे प्रस्ताव दाखल करण्यात आल्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी अर्थसंकल्पात 29 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.

निधी मंजुर करण्यात आलेल्या रस्त्यांची नावे पुढीलप्रमाणे- प्रमुख जिल्हा मार्ग पारनेर-जामगाव, भाळवणी रस्ता सुधारणा करणे 5 कोटी, प्रमुख जिल्हा मार्ग ते नांदूरपठार ते जिल्हा हद्द रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा करणे 4 कोटी 50 लाख, मांडवा, देसवडे, पोखरी, पिंपळगावरोठा, अक्कलवाडी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा करणे 2 कोटी 40 लाख, प्रमुख जिल्हा मार्ग ते हिवरे कोरडा, तिखोल, पिंपळगाव तुर्क, कान्हूरपठार, पिंपळगावरोठा, खंडोबाची वाडी, गारखिंडी ते तालुका हदद रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा करणे 2 कोटी 10 लाख, रेणवडी चोंभूत, वडनेर, निघोज, पिंपरी जलसेन, गांजीभोयरे, पानोली गटेवाडीह प्रमुख राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा करणे 2 कोटी 50 लाख, प्रमुख जिल्हा मार्ग ते हिवरे कोरडा, तिखोल, पिंपळगाव तुर्क, कान्हूरपठार, पिंपळगावरोठा, खंडोबाची वाडी, गारखिंडी ते तालुका हद्द रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सुधारण करणे 2 कोटी 50 लाख, राज्य मार्ग ते बोटा अकलापुर, पळशी, वनकुटे रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा करणे 2 कोटी 40 लाख, राज्य मार्ग ते बोटा अकलपूर, पळशी, वनकुटे रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा करणे 2 कोटी 25 लाख, राज्य मार्ग ते ढवळपुरी, ठाकरवाडी ते इतर जिल्हा मार्ग सुधारणा करणे 1 कोटी 35 लाख, देवीभोयरे फाटा, सुपा, सारोळा रस्ता राज्य मार्ग सुधारणा करणे 4 कोटी. राष्ट्रवादी सत्तेत गेल्याने मतदारसंघाला निधी मिळण्यातील अडचण दूर झाली असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.

या गावांमध्ये होणार रस्त्यांची कामे
पारनेर, जामगांव, भाळवणी 5 कोटी, नांदूरपठार ते कोरठण खंडोबा फाटा 4 कोटी 50 लाख, कारेगांव ते पिंपळगांव रोठा 2 कोटी 40 लाख, पिंपळगांवतुर्क ते कान्हूरपठार 2 कोटी 10 लाख, निघोज कॅनॉल ते पिंपरीजलसेन 2 कोटी 50 लाख, गारखिंडी ते कळस जिल्हा हद्द 2 कोटी 50 लाख, खडकवाडी ते पळशी 2 कोटी 40 लाख, पळशी ते वनकुटे 2 कोटी 25 लाख, वनकुटे ते ठाकरवाडी 1 कोटी 35 लाख चिंचोली ते पुणेवाडी फाटा 4 कोटी.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT