Maharashtra Winter Session 1st Day 
Latest

Maharashtra Winter Session 1st Day : महापुरुषांचं कार्य सर्वांपर्यंत जावे यासाठी पुस्तकांचे वाटप -रोहित पवार

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून (दि. १९,सोमवार) सुरु झालं आहे.  विधिमंडळाबाहेर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मंत्री आणि आमदारांना महापुरुषांचं कर्तृत्व सांगणाऱ्या पुस्तकांचं वाटप करण्यात आलं आहे.  (Maharashtra Winter Session 1st Day ) यामध्ये अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांची पुस्तक देण्यात आली आहेत.

जुनमधील सत्तांसरानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेचं तापले आहे. दरम्यान, भाजपकडून वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली गेली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी , भाजप राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, प्रसाद लाड यांच्याकडून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलं गेलेलं आक्षेपार्ह वक्तव्य. चंद्रकांत पाटील यांच्याकडून समाजसुधारकांबद्दल केलेल विधान या पार्श्वभूमीवरअधिवेशनाच्या तत्पूर्वी हिवाळी अधिवेशनाला येणाऱ्या मंत्री आणि आमदारांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नागपूर अधिवेशनाला येणाऱ्या सर्वांना महाराष्ट्रातील महापुरुषांच कर्तृत्व सांगणारी पुस्तक दिली आहेत. यामध्ये अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांची पुस्तक देण्यात आली आहेत.

महापुरुषांच कार्य सर्वांपर्यंत जावं

पुस्तकांबद्दल माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान होत आहे. खुप अभ्यास करुन चांगले लिखाण करणारे डॉ. जयसिंगराव पवार, आ. हा. साळुंखे यांनी शिफारस केलेली पुस्तके भाजपामधील आमदार, मंत्री, ४० आमदार, विधानसभा विधानपरिषदामधील लोक, विरोधीपक्षातील आमदार, ४० आमदार यांना देणार आहे आणि त्यांना जर ही पुस्तक आवडली तर त्यांनी वाचावी आणि त्यांना आवडली तर आपल्या मतदारसंघात मतदारसंघात सुद्धा द्यावीत. या पाठीमागचा उद्देश असा आहे की महापुरुषांच कार्य सर्वांपर्यंत जावं.

Maharashtra Winter Session 1st Day : सत्तांतरानंतर पहिलेच अधिवेशन

राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यादाच हे अधिवेशन होत असल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे 22 आणि 23 डिसेंबर पक्ष मजबुतीच्या दृष्टीने नियुक्ती पत्र प्रदान करणार आहेत. गेल्या दौऱ्यात त्यांनी कार्यकारिणी बरखास्त केली होती. अधिवेशनामुळे विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना कामाला लागले आहेत. महापालिका निवडणुका असल्याने राजकीय पक्षांचे शक्ती प्रदर्शन यावेळी जोरात पहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT