पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षात वारंवार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतात. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोस्ट करत कॉंग्रससह उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मोहोब्बतच्या दुकानाच्या चावीने करप्शनचे दुकान उघडायचे. मोहोब्बतची झिंग चढवायची आणि रग्गड पैसा कमवायचा." (Maharashtra Politics)
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या 'X' अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,
"काँग्रेसचं आणि दारूचं नातंच मोहोब्बतचं आहे. त्यांची मोहोब्बत हीच त्यांचे 'करप्शनचे दुकान'आहे. सुपर मार्केट आहे. मॉल आहे.!आठवा, कोरोनाच्या काळात घरपोच दारूचे धोरण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने राबविले. लोकं देवदर्शन करायला मंदिरं उघडा, देवदर्शन करू द्या अशी लाखवेळा विनंती सरकारकडे करत होते. पण, उद्धव सरकार देवालये बंदिस्त ठेवून मद्यालये उघडत होते. काय कारण होते? मोहोब्बतच्या दुकानाच्या चावीने करप्शनचे दुकान उघडायचे. मोहोब्बतची झिंग चढवायची आणि रग्गड पैसा कमवायचा. महाराष्ट्र ते झारखंड काँग्रेसच्या गरीब उद्धाराची एकच पद्धत. घमंडीपणा हीच काँग्रेसी करप्शनची गॅरंटी तर भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्याची मोदींची गॅरंटी."
काँग्रेसचं आणि दारूचं नातंच मोहोब्बतचं आहे. त्यांची मोहोब्बत हीच त्यांचे 'करप्शनचे दुकान'आहे. सुपर मार्केट आहे. मॉल आहे.! हे ट्वीट बावनकुळे यांनी आपल्या 'X' अकाउंटवर शेअर केलं होत. ते त्यांनी डीलिट केले. भाजपाच्या या पोस्टवर कॉंग्रेस आणि ठाकरे गट काय प्रत्यूतर देणार याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा