पुढारी ऑनलाइन डेस्क : Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे. जेवणाच्या सुटीपूर्वी शिंदे गटाकडून वकील हरिश साळवे यांनी महत्वपूर्ण युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाकडून वकील नीरज किशन कौल यांचा युक्तीवाद सुरू आहे, यावेळी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणी वेळी वादी प्रतिवादी दोन्हींकडून नबाम रेबिया प्रकरणाचा संदर्भ दिला. यावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे.
Maharashtra Political Crisis : हरीश साळवे यांच्या युक्तीवादानुसार नबाम रेबिया केस हे आता फक्त अॅकॅडमिक राहिले आहे. यापूर्वी कपिल सिब्बल यांनी देखील कालच्या सुनावणीत महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या संदर्भात या नबाम रेबिया केसचा आधार घ्यावा, असे म्हटले आहे.
Maharashtra Political Crisis : यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मोठी टिप्पणी केली आहे. नबाम रेबिया प्रकरण बाजूला ठेवून महाराष्ट्रातील प्रकरणाकडे पाहूया आणि या प्रकरणावर भाष्य करू या, अशी महत्वपूर्ण टिप्पणी सर न्यायाधीश चंद्रचूड यांनी केली आहे.
Maharashtra Political Crisis : सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, नबाम रेबिया प्रकरणाच्या संदर्भाचा उपयोग दोन्ही बाजूंकडून आपआपल्या पद्धतीने केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला बाजूला ठेवून आपण महाराष्ट्रातील प्रकरणाकडे पाहूया, असे ते म्हणाले. मात्र, त्याच वेळी त्यांनी हरिश साळवी यांनी नबाम राबिया केस हे फक्त अॅकॅडमिक राहिले आहे, हा युक्तिवाद खोडून काढला. याशिवाय त्यांनी नीरज कौल यांना नबाम रेबिया केसवर युक्तिवाद करण्यास सांगितले.
न्यायालयाच्या दोन महत्वपूर्ण निर्णयांवर चर्चा
1 अपात्र ठरवलेल्या आमदारांना 12 जुलैपर्यंत दिलेली मुदतवाढ
2. बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी स्थगिती न देता 30 जूनला बहुमत चाचणी घेण्याचे दिलेले आदेश
बहुमत चाचणीला स्थगिती दिल्यानंतर ठाकरेंकडे दोन मार्ग
मात्र बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिला
हे ही वाचा :