नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुर्नवापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल राज्यातील सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस शनिवारी, चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. विज्ञान भवनात राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळयाचे आयोजन केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री शेखावत, केंद्रीय जल शक्ती राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि विश्वेश्वर टुडू केंद्रीय सचिव पंकज कुमार व्यासपीठावर उपस्थित होते. (Maharashtra National Water Awards)
कार्यक्रमात विविध श्रेणीत प्रथम आलेल्या राज्यांना, शहरांना, महानगर पालिकांना, नगर पालिकांना, ग्राम पंचायतींना उपराष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे पुरस्कार केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे आहे.यामध्ये महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आले. (Maharashtra National Water Awards)
उत्कृष्ट ग्राम पंचायत पुरस्कार या श्रेणीमध्ये जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायतीला तिसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार मेघालय राज्यातील री भोई जिल्हा येथील मावकिर्देप या ग्राम पंचायती सोबत विभागून मिळालेला आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील मलकापूर या नगर परिषदेस उत्कृष्ट नागरी स्थानिक संस्था या श्रेणीत तिसरा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार नगराध्यक्ष निलम येडगे आणि उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा जलनिस्सारण व आरोग्य सभापती मनोहर शिंदे यांनी स्वीकारला. हा पुरस्कार सुरत महानगर पालिकेसह विभागून देण्यात आला.गैर सरकारी संस्था या श्रेणीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पुणे येथील भारतीय जैन संघटनेस (बीजेएस) तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.संस्थेचे प्रमुख शांतीलाल मुथा आणि संचालक स्वप्ना पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.