Latest

Maharashtra Assembly Winter Session 2023 : ड्रग्स प्रकरणात पोलिसांचा थेट सहभाग आढळल्यास होणार बडतर्फ; फडणवीसांची विधानपरिषदेत घोषणा

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ड्रग्स प्रकरणात सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. हा भावी पिढीचा प्रश्न आहे. या प्रकरणात ज्यांचा थेट संबंध आहे, त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. यापुढेही ड्रग्स प्रकरणात ज्या पोलिस अधिकाऱ्यांचा किंवा कर्मचाऱ्यांचा थेट संबंध असेल त्यांना बडतर्फ केलं जाईल. हीच सरकारची भूमिका असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१२) केली. ललित पाटील ड्रग्स प्रकरणी विधानपरिषदेत माहिती देताना ते बोलत होते.

ललित पाटील ड्रग्स प्रकरणावर आज विधानपरिषदे चर्चा करण्यात आली. ड्रग्स प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांच्या सहभागाची शक्यता असल्याचे आमदार भाई जगताप यांनी सांगितले. तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनीही सोसायटीचे वॉचमनही ड्रग्स विकतात. लहान मुलांनाही ड्रग्स घेताना पाहिलं असल्याचे सांगितले.

यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ललित पाटील प्रकरणाचा तपास सुरू असून या प्रकरणात कोणत्याही अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले तर त्यांना बडतर्फ केलं जाईल. ललित पाटीलने काही लोकांच्या मदतीने ड्रग्सची फॅक्टरीच सुरू केली होती. या प्रकरणात आणखी खुलासे करणार आहे. ड्रग्स प्रकरणात सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांचा थेट सहभाग आढळल्यास त्यांना बडतर्फ केलं जाईल. ड्रग्स पेडलरसह संबंधितांवर कारवाई केली जाईल. आताच आपण योग्य कारवाई केली नाही तर पुढील पिढी याच्यात बरबाद होऊ शकते. आज इन्स्टाग्राम हे मार्केटप्लेस झालं आहे. इन्स्टाग्रामवर ऑर्डर करून ऑनलाईनल पैसे देवून कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरी होते. ही एक अडचण आहे. तरीदेखील सगळ्या कुरीअर एजन्सींना कुरीअर तपासण्याची जबाबदारी दिली आहे. शाळांजवळ असलेल्या पान टपऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. सरकारने ई-सिगारेटवरही कारवाई केली असल्याची माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT