मुंबई : पुढारी ऑनलाईन
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिभाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी शिवरायांबद्दल केलेल्या अवमानकारक विधान केल्याच्या निषेधार्थ सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्याने राज्यपालांनी तत्काळ अभिभाषण थांबवलं.
राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या अवमानकारक विधान केल्याचे तीव्र पडसाद अधिवेशन सुरु होताच उमटले. राज्यपालांनी अभिभाषण सुरु झाले. यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी सुरु केली. यावेळी प्रचंड गदारोळ झाला. यावेळी राज्यपालांनी अभिभाषण थांबवले. यानंतर काही क्षणात ते सभागृह सोडून गेले. राज्यपालांनी सभागृह सोडून जाणे दुर्दैवी आहे, असे मत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी विधानभवन येथे आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.
हेही वाचलं का?