पुढारी ऑनलाईन: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (दि.१५ सप्टेंबर) मोठी कारवाई केली आहे. महादेव ऑनलाइन ॲप बेटिंग प्रकरणात ईडीने 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. ईडीने सांगितले की, आम्ही कोलकाता, भोपाळ, मुंबई इत्यादी शहरांमध्ये महादेव ॲपशी जोडलेल्या मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कच्या छापेमारी केली असून मोठ्या प्रमाणात पुरावे जप्त केले आहेत. या छाप्यात ईडीला अनेक आक्षेपार्ह कागदपत्रेही मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. (Mahadev APP)
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही कोलकाता, भोपाळ, मुंबई इत्यादी शहरांमध्ये महादेव ॲपशी जोडलेल्या मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कवर शोध घेत आहे. दरम्यान आत्तापर्यंत या प्रकरणात गैरमार्गातून मिळवलेली 417 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे, असे देखील ईडीने त्यांंच्या अधिकृत 'X' वरून (पूर्वीचे ट्विटर) दिली आहे. (Mahadev APP)
सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे दोघे या 'महादेव' ऑनलाइन सट्टेबाजार ॲपचा प्रचार करतात. ही कंपनी दुबईतून चालवली जाते, अशी माहिती ईडीच्या तपासातून समोर आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ईडीने अलीकडेच कोलकाता, भोपाळ आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये महादेव अॅपशी जोडलेल्या मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली. या काळात मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करणारे पुरावे मिळाले आहेत. तापासादरम्यान ईडीने मोठ्या प्रमाणात रक्कम देखील जप्त केली आहे.