शिवपुरी (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील (Shivpuri district) एका घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील शेतकऱ्याचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा (unseasonal rains) मोठा फटका बसला. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतशिवारातील उभे पीक आडवे झाले आहे. पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी जेव्हा माजी आमदार महेंद्र सिंह यादव आणि जिल्हाधिकारी अक्षय कुमार सिंह एका शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचतात; त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी माजी आमदाराच्या पायावर डोके आपटून आक्रोश करत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.
'साहेब मी उद्ध्वस्त झालोय. जगणे मुश्किल झालंय. माझ्या शेतातील सर्व पिकाचे नुकसान झालंय. मी आता काय करु' अशी आपली व्यथा मांडत शेतकऱ्यांने माजी आमदाराच्या पायावर डोके आपटले. यावेळी पोलिसांनी सदर शेतकऱ्याला उठवून त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शिवपुरी जिल्ह्यातील १०० हून अधिक गावांतील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
हे ही वाचा :