lunar surface Photographs  
Latest

lunar surface Photographs : चंद्राच्या पृष्ठभागाची सर्वात सुस्पष्ट छायाचित्रे

Arun Patil

वॉशिंग्टन : चंद्राच्या पृष्ठभागाची (lunar surface Photographs) एका रडार सिस्टीमच्या सहाय्याने छायाचित्रे टिपण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, ही छायाचित्रे पृथ्वीवरून काढलेली चंद्राची सर्वात सुस्पष्ट छायाचित्रे किंवा 'हायेस्ट रिझोल्युशन पिक्चर्स' ठरली आहेत. घरगुती वापराच्या मायक्रोवेव्ह ओव्हनपेक्षाही कमी शक्तिशाली असलेल्या रडार सिस्टीमने इतकी चांगली छायाचित्रे टिपता येऊ शकतात, ही थक्क करणारीच बाब ठरली आहे.

अमेरिकेत सिएटलमध्ये 10 जानेवारीला झालेल्या अमेरिकन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या 241 व्या बैठकीतील प्रेस कॉन्फरन्सवेळी ही छायाचित्रे दाखवण्यात आली. या छायाचित्रांमध्ये 'नासा'च्या 'अपोलो-15' मोहिमेतील लँडिंग साईट तसेच चंद्रावरील 'टायको क्रेटर' नावाचे विवरही स्पष्टपणे पाहता येऊ शकते. वेस्ट व्हर्जिनियामध्ये असलेल्या 330 फूट किंवा 100 मीटरचा व्यास असलेल्या ग्रीन बँक टेलिस्कोपच्या सहाय्याने (lunar surface Photographs) ही छायाचित्रे टिपली आहेत. हा जगातील सध्याचा सर्वात मोठा स्टीएरेबल रेडिओ टेलिस्कोप आहे. अशा टेलिस्कोपची डिश ही आकाशातील हव्या त्या भागावर लक्ष्य करून वळवता येऊ शकते.

ग्रीन बँक ऑब्झर्व्हेटरीच्या रडार विभागाचे प्रमुख पॅट्रिक टेलर यांनी याबाबतची माहिती दिली. या ग्रीन बँक टेलिस्कोपने चंद्राच्या दिशेने रेडिओ लहरी सोडल्या होत्या (lunar surface Photographs) आणि त्यानंतर त्याचे इको हवाईतील हिलो येथील व्हेरी लाँग बेसलाईन अ‍ॅरेमधील 82 फूट रुंदीच्या चार रेडिओ टेलिस्कोपच्या एका सेटद्वारे टिपण्यात आले. सोबतच्या छायाचित्रात चंद्रावरील टायको क्रेटर दिसत आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT