नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भातील माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत आज (दि.२६) भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला विदर्भात पुन्हा धक्का बसला आहे.
नागपूर -विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचे सहकारी व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष असणारे डॉ. नामदेव उसेंडी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर नागपुरात आज (दि.२६) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. काँग्रेसमध्ये पैसेवाल्यांनाच उमेदवारी दिली जाते, असा गंभीर आरोप करीत माजी आमदार उसेंडी यांनी आज आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाने प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी गडचिरोलीचे माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी हेही इच्छूक होते. त्यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षाने डॉ.किरसान यांच्यावर विश्वास टाकला. यामुळे आपण आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांच्याकडे पाठविल्याचे डॉ.उसेंडी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
हेही वाचा :