Lok Sabha Election 2024

Lok Sabha Elections 2024 : कवठेसार मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हीलचेअर नसल्याने गोंधळ

मोहन कारंडे

दानोळी; पुढारी वृत्तसेवा : कवठेसार येथील मतदान केंद्रावर व्हीलचेअर नसल्याने ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांची फरफट झाली. निवडणूक कर्मचाऱ्यांनी व्हीलचेअरची व्यवस्था केली नसल्याने नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. व्हीलचेअर उपलब्ध करा नाहीतर मतदान प्रक्रिया बंद करा, असा पवित्रा माजी सरपंच व स्वाभिमानीचे समर्थक अमोल नांद्रेकर यांनी घेतला. यावेळी मतदान कर्मचारी आणि पोलिसांची तारांबळ उडाली होती.

शिरोळ तालुक्यातील कवठेसार कुमार विद्या मंदिर आणि दादा नाना भोकरे हायस्कूल येथे मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले, पण कुमार विद्या मंदिर केंद्रावर व्हीलचेअर नसल्याने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांची गैरसोय होत होती. या मतदारांनी मतदान कसे करायचे, अशी विचारणा होऊ लागली. त्यामुळे मतदान कर्मचारी आणि पोलिसांची काही काळ तारांब उडाली. यावरून मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ झाला. यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी घटना जाणून घेण्यासाठी केंद्रावर गेले असता पी.एस.आय कोळेकर यांच्यासह पोलिसांनी मज्जाव केला. ११ वाजण्याच्या सुमारास अधिकाऱ्यांनी व्हीलचेअर उपलब्ध केली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT