Lok Sabha Election 2024  
Latest

Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडी पाठींबा देईल : राजू शेट्टी

सोनाली जाधव

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा, गतवेळी झालेल्या चुका दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला असून, सतत जनसंपर्क ठेवत नाराजी दूर करुन मतपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. माझा निवडणूक लढवण्याचा होमवर्क पूर्ण असल्याने विरोधातील उमेदवाराशी देणेघेणे नाही. जनतेच्या पाठबळावर विजय निश्चित, असा विश्वास माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (दि.२९) इचलकरंजीत व्यक्त केला. भाजपचा पराभव करायचा असल्याने महाविकास आघाडी पाठींबा देईल असा पुनरुच्चारही त्यांनी केला. (Lok Sabha Election 2024 | )

इचलकरंजीत आज माजी खा. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या विविध पदाधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या. तसेच त्यांनी अन्य संघटनांच्या पदाधिकार्‍यांशीही संवाद साधला. दिवसभर महाविकास आघाडीचे प्रमुख मदन कारंडे, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, महादेव गौड, सयाजी चव्हाण, नितीन जांभळे, सदा मलाबादे, भरमा कांबळे, दत्ता माने आदी विविध पदाधिकार्‍यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. इचलकरंजी इंजिनिअरींग असोसिएशन तसेच इचलकरंजी बार असोसिएशन याठिकाणी भेट देवून शेट्टी यांनी चर्चा केली. तसेच निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत सागर संभुशेटे, विकास चौगुले, बाळगोंड पाटील, आण्णासाहेब शहापुरे, विद्यासागर चराटे, स्वस्तिक पाटील, गोवर्धन दबडे, हेमंत वणकुंद्रे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT