जळगाव जिल्ह्यात कापूस पासून धागा, धाग्यापासून कपडा तर प्लास्टिक पार्क अशी आश्वासने मिळूनही अजून पर्यंत धागाही निघाला नाही आणि कापूस ही पिंजला गेला नाही. मात्र राजकारणातील समीकरणे फार बदलून गेलेली आहे. जी एकतर्फी लढाई दिसणार होती ती आता दुतर्फी झालेली आहे. आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत. अशातही मशाल हाती घेतलेला उमेदवार गिरीश महाजन यांना आदर्श मानतो ही समीकरणे काही वेगळेच संकेत देऊन जात आहे. तर दुसरीकडे, महिलांच्या उमेदवारीला जळगाव, रावेर दोन्ही लोकसभांमध्ये विरोध सुरुवातीपासून होत आहे. नेतेही हा ला हा लावत आहे. तर आघाडीने भाजपाचा उमेदवार फोडून भाजपा समोर उभा करून दिला आहे. त्यामुळे विजय किंवा पराजय हा कोणाचाही झाला तरी हार फक्त भाजपाची होईल. हे मात्र निश्चित. (Lok Sabha Election 2024)
जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडी असो की अजून दुसऱ्या कोणत्या आघाड्या असो कुणीही आपली उमेदवारी अजूनही जाहीर केलेली नाही. यामध्ये रावेर लोकसभेत वंचित बहुजन आघाडीने आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार कोट्यामध्ये गेलेल्या जागेसाठी अजूनही उमेदवाराचा शोध सुरू आहे. दुसरीकडे जळगाव लोकसभेमध्ये महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने आघाडी घेत मशाल साठी उमेदवार जाहीर केला आहे. या मशाल हातात धरण्यासाठी त्यांनी भाजपाच्या विद्यमान खासदारांनाच फोडले. त्याचबरोबर पारोळ्याचे नगराध्यक्ष त्यांनी आपल्या पदरात पाडून घेतले व त्यांनाच आपली मशाल हाती देऊन कमळासमोर एक आव्हान उभे केले. (Lok Sabha Election 2024)
जळगाव लोकसभेमध्ये उमेदवार मिळणार त्या ताकतीचा नसेल अशी अटकने लावत असताना बरोबरीचा व भाजपाच्या कडेवर तयार झालेला एक नाही दोन उमेदवार समोर आले. एक उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवणार तर दुसरा त्याला मदत करणार आहे. करण पाटील यांना मोठा राजकीय वारसा आहे. या सगळ्यात आता अडचण होणार ती शिंदे गटाची होणार आहे.
मतदासंघात राष्ट्रवादी अजित पवार गट व एकनाथ शिंदे शिवसेना अजून पाहिजे तसे प्रचारात उतरलेले दिसून येत नाहीये. जो तो आपापल्या विधानसभेमध्ये अंग राखून काम करताना दिसून येत आहे. मात्र मशाल साठी करण पाटील हा उमेदवार आल्याने भविष्यात शिंदे गटाच्या आमदारांना अडचणी येऊ नये म्हणून त्यांना जोर लावावा लागणार आहे. भाजपा जरी म्हणत असले की, जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा आमचा बालेकिल्ला आहे मात्र आजपर्यंत त्यांना या बालेकिल्ल्यात तत्कालीन भाजपा शिवसेना यांच्या युतीमुळेच फायदा झालेला आहे. आजही भाजपा शिवसेनेची युती असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाची पण साथ मिळालेली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांनी ताकद लावल्याशिवाय भाजपासही गड सर होणार नाही मात्र भाजपा गेल्या वेळेस सारखे विधानसभेत अप्रत्यक्षरीत्या उमेदवार उभे करणार नाही याची शाश्वती कोणी देत नसल्याने ते पण थंड बसतात गेले ते दिसत आहे.
याचा परिणाम असा झाला की जिल्ह्यात महायुतीची समन्वय बैठक एकच झाली. त्यानंतर तालुका पातळीवर समन्वय बैठका झाल्या नाही. याचा पडसाद भुसावळ येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिसून आला तो असा की विद्यमान खासदार यांना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यालयात जाऊन पदाधिकाऱ्यांची समजूत काढावी लागली व त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना कार्यकर्त्याच्या मेळाव्यात जावे लागले.
त्यामुळे तीन ठोके तीनही बाजूने अशी परिस्थिती सध्याला महायुतीमध्ये दिसत आहे. महाआघाडीचे तर विषय सोडून द्या, या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट हे आपापल्या बालेकिल्ल्यांमध्येच खुश असल्याचे दिसून येत आहे. मात्र जळगावचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे गट कामाला लागलेला दिसून येत आहे. तर शरद पवार गट अजूनही रावेरचा उमेदवार कोण याच प्रश्न जवळ फिरताना दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभांमध्ये संकटमोचक त्यांना जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. जरी पाच लाखाच्या लीडने जिंकण्याची भाषा करणारे गिरीश महाजन यांनी माजी खासदार एटी नाना यांना बोलून त्यांच्याशी चर्चा केली जे की आजपर्यंत कुठे दिसत नव्हते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार करण पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझ्या कार्यालयात गिरीश महाजन व इतर लोकांचे फोटो आहेत. यातील महाजन यांचा फोटो हा निघणार नाही कारण ते माझे आदर्श आहेत. यामुळे वेगळेच संकेत दिसत आहेत. त्यांनी भाजपला रामराम केला मात्र गिरीश महाजन यांना नाही. त्यामुळे जळगावच्या राजकारणात आतल्या आत काय सुरु आहे याचा अंदाज घेणही कठीण झालय.
हेही वाचा :