Liz Truss 
Latest

Liz Truss : लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान: ब्रिटन-भारत संबंध मजबूत होणार

Shambhuraj Pachindre

लंडन : वृत्तसंस्था ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी झालेल्या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. भारतीय मूळ असलेले ऋषी सुनाक यांचा 20 हजारांवर मतांनी पराभव करून लिझ ट्रस (Liz Truss) या पदावर विराजमान झाल्या आहेत. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक जाहीर करण्यात आली होती. लिझ यांना ब्रिटिश राजकारणात फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखले जाते. दोन महिने या निवडणुकीची प्रचार मोहीम चालली. दरम्‍यान, याआधी लिझ क्रस या ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री होत्या. त्यांच्या या 11 महिन्यांच्या कार्यकाळात भारत आणि ब्रिटनमधील संबंध एका नव्या उंचीवर गेले. आता त्या पंतप्रधान झाल्या आहेत म्हटल्यावर हे संबंध अधिक मजबूत होतील, असे आंतरराष्ट्रीय वर्तुळातून बोलले जा

लिझ या ब्रिटनच्या तिसर्‍या महिला पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे या महिला पंतप्रधान ब्रिटनला लाभल्या आहेत. मार्गारेट थॅचर या लिझ यांच्या आदर्श आहेत. विविध प्रकारचे आरोप झाल्यानंतर हुजूर पक्षाचे बोरिस जॉन्सन यांना 7 जुलै रोजी राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर हुजूर पक्षात लिझ ट्रस (Liz Truss) यांची लढत ऋषी सुनाक यांच्याशी झाली.

पक्षाच्या सुमारे 1.60 लाख सदस्यांनी मतदान केले. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे हुजूर पक्षातील खासदारांच्या मतदानांतर्गत पाचही फेर्‍यांमध्ये ऋषी सुनाक यांनी लिझ यांना मागे टाकले होते. पण अंतिम निर्णय या पक्षाच्या सुमारे 1 लाख 60 हजार नोंदणीकृत सदस्यांनी घेतला. स्थानिक म्हणूनही लिझ यांना या मतदारांची पसंती मिळाली. मावळते पंतप्रधान बोरिस जॉन्सनही लिझ यांनाच अनुकूल होते.
लिझ यांनी तीन पंतप्रधानांसमवेत काम केले आहे. सहावेळा मंत्रिपद भूषविले आहे. हग ओ लॅरी हे त्यांचे पती असून, त्यांना दोन मुली आहेत. 47 वर्षांच्या लिझ यांचा जन्म (1975) ऑक्सफोर्ड येथील असून, याच विद्यापीठातून त्यांनी शिक्षणही घेतले आहे.

आज शपथविधी

मंगळवारी 6 सप्टेंबर रोजी, मावळते पंतप्रधान जॉन्सन आपले अखेरचे भाषण करतील. नंतर महाराणी एलिझाबेथ यांच्याकडे राजीनामा सादर करतील. नूतन पंतप्रधान लिझही त्यांच्यासोबत असतील. त्या राणीची भेट घेतील. क्‍वीन एलिझाबेथ यांची वयोमानाने प्रकृती ठीक नसते म्हणून हा कार्यक्रम बकिंगहॅम पॅलेसऐवजी स्कॉटलंडमधील प्रासादात होणार आहे. यानंतर लिझ आपल्या मंत्रिमंडळाची निवड करतील. राणी एलिझाबेथ 'झूम कॉल'वर मंत्र्यांना शपथ देतील. मंत्रिमंडळाची पहिली बैठक बुधवारी (दि. 7) होईल.

भूमिका ते वास्तव!

लिझ 7 वर्षांच्या असताना एका शालेय नाटकात त्यांनी माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची भूमिका वठविली होती आणि आज त्या स्वत: पंतप्रधान बनल्या आहेत.

आकडे बोलतात…
लिझ ट्रस : 81,326
ऋषी सुनाक : 60,399
एकूण मते : 172,437
नाकारलेली मते: 654
एकूण मतदान : 82.6%

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT