Latest

लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणार्‍या प्रेयसीचा चाकूने भोसकून निर्घृण खून

अमृता चौगुले

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  दुसर्‍या मुलीशी लग्न करण्यास लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणार्‍या प्रेयसीने विरोध केल्याचा राग आल्यामुळे प्रियकराने प्रेयसीचा चाकुने भोसकुन निर्घृण खून केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष असे की, खुनी स्वत:च शिर्डी पोलिस ठाण्यात हजर झाला. शिर्डी येथून जवळच असलेल्या रूई शिवारात भोपळे वस्तीवर ही दुर्दैवी घटना घडली. मृत तरुणी 25 वर्षांची आहे. पहिल्या पतीसह दोन मुलांना सोडून ती आरोपी अजय राजेंद्र म्हस्के (रा. राम सोमय्यानगर, सावळेविहिर) याच्यासोबत पती-पत्नीसारखी रहात होती. दरम्यान, रविवारी सकाळी रूई येथील भोपळे वस्तीवर अजय म्हस्के याने स्वतःच्या पत्नीचा खून केल्याचा कॉल पोलिसांना 112 नंबरवर आला.

पो. नि. नंदकुमार दुधाळ यांनी पथकासह भोपळे वस्तीवर धाव घेतली. प्रेयसी तरुणी रक्तभंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडली होती. घटनास्थळावरून तिला श्रीसाईबाबा रूग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ती मृत असल्याचे घोषीत केले. अजयचे आई-वडील त्याचे लग्न ठरवित होते, मात्र आपले कुटूंब सोडून अजयसोबत राहणारी महिला दुसर्‍या मुलीशी लग्न करण्यास विरोध करीत होती. या कारणावरून दोघांमध्ये वाद-विवाद होत असल्याने महिलेच्या त्रासाला कंटाळून धारदार हत्याराने भोकसून निर्घृण खून केल्याचे अजयने पोलिसांना सांगितले.

कडू आव्हाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अजयविरुद्ध शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. नंदकुमार दुधाळ अधिक तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT