Latest

Lisa Sthalekar : ऑस्ट्रेलियाच्या लिसा स्टालेकर बनल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स महासंघाची पहिली महिला अध्यक्ष

अमृता चौगुले

कॅनबेरा; पुढारी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स महासंघाच्या (फिका) (International Cricketers' Association (FICA)) अध्यक्षस्थानी एका दिग्गज महिला क्रिकेटर्सला अध्यक्ष बनविण्यात आले आहे. याच बरोबर ही खेळाडू पहिली महिला अध्यक्ष बनली आहे. स्वित्झर्लंड मधील नियॉन येथे आयोजित फिकाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऑस्ट्रेलियाची दिग्गज क्रिकेटपटू व माजी कर्णधार लिसा स्टालेकर (Lisa Sthalekar) यांना फिकाच्या पहिला महिला अध्यक्ष बनण्याचा मान मिळाला आहे.

या आधी दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू बॅरी रिचर्डस आणि वेस्टइंडिजचे अष्टपैलू खेळाडू जिमी ॲडम्स यांना या आधी अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली होती. इंग्लडचे माजी क्रिकेटपटू विक्रम सोलंकी हे यापुर्वी फिकाचे अध्यक्ष होते. आता सोलंकी यांच्याकडून लिसा स्टालेकर (Lisa Sthalekar) या पदभार स्विकारतील.

दरम्यान फिकाच्या वतीने सांगण्यात आले की, 'स्वित्झर्लंडच्या नियॉन येथे या आठवड्यात पार पडलेल्या फिका कार्यकारिणी समितीच्या बैठकीत लिसा स्टालेकर (Lisa Sthalekar) यांना फिकाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे'. कोरोना संकटाच्या कार्यकाळानंतर फिकाची पहिलीच बैठक पार पडली. फिकाचे कार्यकारी अध्यक्ष हीथ मिल्स म्हणाले, ''फिकाच्या सदस्यांच्या विचार विनिमयानंतर पहिल्या महिला अध्यक्षा लिसा स्टालेकर यांच्या रुपात मिळाल्याचे घोषित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे''.

या नियुक्ती नंतर स्टालेकर (Lisa Sthalekar) म्हणाल्या, 'आपण खेळाच्या एका नव्या युगात प्रवेश करतो आहोत. ज्यामध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंना पुर्वीपेक्षा अधिक क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार आहे. अनेक देश आता हा खेळ खेळत आहेत. त्यामुळे क्रिकेट हा एक जागतिक खेळ बनत आहे'. पुणे येथे जन्म झालेल्या लिसा स्टालेकर या ४१ वर्षांच्या असून त्यांनी क्रिकेट मधील तिन्ही प्रकारात १८७ आंतरराष्ट्रीय सामने खेळत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केल आहे.

लिसा स्टालेकर यांची कारकिर्द

लिसा स्टालेकर यांनी १२५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी २ शतक आणि १६ अर्धशतकांच्या मदतीने २७२८ रन बनविले आहेत. या व्यतिरिक्त फिरकी गोलंदाज म्हणून त्यांनी १४६ बळी घेतले आहेत. एकदिवसीय सामन्यात १००० हजार धावा करणाऱ्या व १०० विकेट घेणाऱ्या त्या पहिल्या महिला क्रिकेटर बनल्या होत्या. या शिवाय त्यांनी आठ कसोटी सामने तसेच ५४ टी २० सामने खेळले आहेत. २०२१ मध्ये त्यांना ऑस्ट्रेलिया क्रिकेट हॉल ऑफ फेम मध्ये स्थान देण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT