Yoga For Hair Growth Canava
lifestyle

Yoga For Hair Growth | केस लांब आणि घनदाट करण्यासाठी योगासनांचा जबरदस्त फायदा

Yoga For Hair Growth | रासायनिक प्रॉडक्ट्स विसरा; योगाने वाढवा केसांची नैसर्गिक वाढ

shreya kulkarni

Yoga For Hair Growth

आजकाल प्रत्येकालाच लांब, घनदाट आणि मजबूत केस हवे असतात. पण प्रदूषण, ताणतणाव, चुकीचा आहार आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स यामुळे केस गळणे, पातळ होणे आणि अकाली पांढरे होणे यासारख्या समस्या वाढल्या आहेत. अशावेळी नैसर्गिक उपाय म्हणजे योगासन हा केसांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. योगासनामुळे डोक्याकडे रक्तपुरवठा वाढतो, ताण कमी होतो आणि शरीराला योग्य पोषण मिळते. यामुळे केसांच्या मुळांना बळकटी येते आणि केसांची वाढ जलद होते.

चला जाणून घेऊया अशी ५ प्रभावी योगासने जी नियमित केल्यास केसांची वाढ सुधारेल

Adho Mukha Svanasana

1. अधो मुख स्वानासन (Adho Mukha Svanasana)

हे आसन "डाउनवर्ड फेसिंग डॉग" पोज म्हणून ओळखले जाते. यात शरीर उलट्या ‘V’ आकारात येतो, डोकं खाली आणि पाय वर राहतात. या आसनाने डोक्याकडे रक्तप्रवाह वाढतो, केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि ताणतणाव कमी होतो. १-२ मिनिटे या स्थितीत राहणे फायदेशीर.

Sirsasana

2. शीर्षासन (Sirsasana)

योगातील हे सर्वात महत्त्वाचे आसन मानले जाते. पूर्ण शरीराचे संतुलन डोक्यावर येते, ज्यामुळे स्कॅल्पमध्ये रक्तसंचार वाढतो. यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते आणि केसगळती कमी होते. नवशिक्यांनी हे आसन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली किंवा भिंतीचा आधार घेऊन करावे.

Uttanasana

3. उत्तानासन (Uttanasana)

फॉरवर्ड बेंड पोज म्हणतात. पुढे वाकून केल्याने डोक्यात रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो, ताण कमी होतो. ताणामुळे होणारी केसगळती कमी करण्यासाठी हे आसन उत्तम आहे.

Balayam Yoga

4. बलायाम योग (Balayam Yoga)

ही अतिशय सोपी पण प्रभावी एक्सरसाइज आहे. दोन्ही हातांच्या नखांना एकमेकांवर घासल्याने डोक्यावरील नसांना उत्तेजना मिळते आणि हेअर फॉलिकल्स सक्रिय होतात. यामुळे केसांची वाढ होते आणि पांढरे केस काळे होण्यास मदत होते.

Vajrasana

5. वज्रासन (Vajrasana)

जेवणानंतर बसण्यासाठी सर्वोत्तम आसन. हे पचनशक्ती सुधारते, शरीराला योग्य पोषण मिळते आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे केसांना फायदा होतो. ताण कमी करून केसगळती कमी करण्यासही मदत करते.

फक्त योगासनच नव्हे तर संतुलित आहार, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली हेसुद्धा केसांच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT