हिवाळा सुरू झाला की, अंथरुणातून बाहेर पडणे एक मोठे आव्हान वाटू लागते. थंड हवामानात उबदार पांघरुणात जास्त वेळ झोपून राहण्याचा किंवा दिवसभर आळस करण्याची इच्छा का होते? तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात जास्त झोप येणे हे नैसर्गिक आहे आणि यामागे आपल्या शरीरात होणारे काही महत्त्वाचे जैविक बदल आणि सूर्यप्रकाशाची कमी उपलब्धता जबाबदार असते. हिवाळ्यात जास्त झोप येण्यामागील मुख्य कारणे आणि त्यावरचे उपाय सविस्तर जाणून घेऊया
मेलाटोनिन हे 'स्लीप हार्मोन' म्हणून ओळखले जाते. अंधार झाल्यावर हे हार्मोन शरीरात जास्त प्रमाणात तयार होते, ज्यामुळे आपल्याला झोप येते.
हिवाळ्यात दिवस लहान होतात आणि सूर्य लवकर मावळतो. त्यामुळे शरीराला लवकरच अंधाराची जाणीव होते आणि संध्याकाळपासूनच मेलाटोनिनचे प्रमाण वाढू लागते. परिणामी, आपल्याला लवकर झोप येते आणि सकाळी उशिरापर्यंत झोपून राहावेसे वाटते.
संशोधनात असे दिसून आले आहे की, हिवाळ्यात मनुष्याला 'आरईएम स्लीप' चा कालावधी जास्त लागतो. REM ही झोपेची सर्वात महत्त्वाची अवस्था आहे, जेव्हा मेंदू दिवसभराची माहिती गोळा करतो आणि स्वप्ने पाहतो.
REM झोप वाढल्यामुळे, शरीर जास्त वेळ झोपेत राहण्याचा नैसर्गिक प्रयत्न करते, ज्यामुळे एकूण झोपेचा कालावधी वाढतो.
सेरोटोनिन हे 'हॅपी हार्मोन' म्हणून ओळखले जाते. सूर्यप्रकाशामुळे याचे उत्पादन वाढते.
हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने सेरोटोनिनचा स्तर खाली येतो.
उदासीनता किंवा सीझनल ॲफेक्टिव्ह डिसऑर्डर (SAD) ची लक्षणे दिसू शकतात. अशा स्थितीत शरीराला ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटते आणि परिणामी जास्त झोप येते.
सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे हिवाळ्यात अनेक लोकांमध्ये व्हिटॅमिन-डी ची कमतरता दिसून येते.
व्हिटॅमिन-डी च्या कमी स्तरामुळे थकवा, आळस आणि जास्त झोप येणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
थंडीमुळे लोक घराबाहेर पडणे किंवा व्यायाम करणे टाळतात.
शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे शरीराची चयापचय क्रिया मंदावते आणि आळस वाढतो. यामुळे दिवसभर जडपणा जाणवतो आणि जास्त झोपेची आवश्यकता वाटते.
कृत्रिम प्रकाश: सकाळी उठल्याबरोबर घरात जास्तीत जास्त प्रकाश येऊ द्या. खिडक्यांचे पडदे उघडा. शक्य असल्यास कामाच्या ठिकाणी किंवा घरात उजेडासाठी चांगली रोषणाई वापरा.
सकाळचा सूर्यप्रकाश: रोज सकाळी लवकर उठून 10 ते 15 मिनिटे उन्हात बसा किंवा फिरा. यामुळे मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन थांबते आणि सर्कॅडियन सायकल वेळेवर सेट होते.
झोपेची वेळ निश्चित करा: रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित करा. सुट्टीच्या दिवशीही या वेळेत जास्त बदल करू नका. यामुळे शरीराचे अंतर्गत घड्याळव्यवस्थित कार्य करते.
नियमित व्यायाम: थंडी असली तरी रोज किमान 20-30मिनिटे व्यायाम करा. यामुळे शरीरात उष्णता आणि ऊर्जा निर्माण होते आणि आळस कमी होतो.
संतुलित आहार: अति गोड, तळलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा. व्हिटॅमिन-डी युक्त पदार्थ (दूध, अंडी, मासे) आणि हंगामी फळे व भाज्यांचा आहारात समावेश करा.
थंड पाण्याने चेहरा धुवा: सकाळी आळस आल्यास थंड पाण्याने चेहरा धुवा किंवा अंघोळ करा. यामुळे लगेच उत्साह येतो आणि आळस दूर पळतो.
हिवाळ्यात जास्त झोप येणे हे नैसर्गिक असले तरी, आपल्या जीवनशैलीत योग्य बदल करून आपण आळस आणि जास्त झोपेवर नियंत्रण मिळवू शकतो. सकाळी वेळेवर उठून सूर्याच्या प्रकाशात काही वेळ घालवणे हाच यावरचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे.