सरकारी कर्मचार्‍यांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध pudhari photo
lifestyle

Parental Control Apps | डिजिटल युगातील मोठं आव्हान! मुलांचा मोबाईल वापरावर लक्ष ठेवण्यासाठी; पालकांसाठी सेप्या टिप्स

Parental Control Apps | आजच्या डिजिटल युगात इंटरनेटचा वापर प्रत्येक कामासाठी केला जातो. शिक्षण, गेमिंग किंवा एंटरटेनमेंटसाठी मुलंही मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात.

पुढारी वृत्तसेवा

Parental Control Apps

आजच्या डिजिटल युगात इंटरनेटचा वापर प्रत्येक कामासाठी केला जातो. शिक्षण, गेमिंग किंवा एंटरटेनमेंटसाठी मुलंही मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. पण इंटरनेटचा योग्य वापर न केल्यास त्याचा चुकीचा परिणाम मुलांच्या स्वभावावर आणि व्यक्तिमत्त्वावर होऊ शकतो. त्यामुळे पालकांसाठी मुलांच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

इंटरनेटवर ज्ञान, माहिती आणि मनोरंजन मिळतं, पण त्याचबरोबर काही नकारात्मक गोष्टींचा देखील प्रभाव पडतो. मुलांना डिजिटल जग सुरक्षित पद्धतीने वापरता यावं यासाठी पालकांनी काही स्मार्ट टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे.

1. मुलांशी संवाद साधा

सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांशी संवाद साधा. ते इंटरनेटचा वापर कशासाठी करतात, कोणत्या वेबसाइट्स किंवा अ‍ॅप्स वापरतात हे जाणून घ्या. मुलांना वाटलं की पालक त्यांना समजून घेत आहेत, तर ते स्वतःहून त्यांचे अनुभव आणि अडचणी शेअर करतात.

2. पॅरेंटल कंट्रोल अ‍ॅप्स वापरा

आजकाल बहुतांश मोबाईल, टॅबलेट आणि कॉम्प्युटर्समध्ये पॅरेंटल कंट्रोल फीचर असतं. याशिवाय खास पॅरेंटल कंट्रोल अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित करता येतो आणि अवांछित वेबसाइट्स ब्लॉक करता येतात.

3. ऑनलाइन सेफ्टी शिकवा

मुलांना सांगा की त्यांची वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, शाळेचं नाव, फोन नंबर) कोणाशीही शेअर करू नये. मोबाईलवर आलेल्या संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नये, कारण त्यामुळे फसवणूक होऊ शकते.

4. मोबाईल वापरण्याचा वेळ ठरवा

पढ़ाई, गेमिंग किंवा इतर कामांसाठी मुलांना मोबाईल वापरण्याचा वेळ निश्चित करा. रात्री उशिरा किंवा जेवणाच्या वेळी मोबाईल वापरण्याची सवय टाळायला हवी. शक्य असल्यास शिक्षणासाठी इंटरनेट वापरताना पालकांनी स्वतः मुलांसोबत बसावं.

5. स्वतः रोल मॉडेल बना

मुलं नेहमी मोठ्यांकडून शिकतात. त्यामुळे पालकांनी स्वतःचा स्क्रीन टाइम कमी करावा. ऑफिसचं काम संपल्यावर सतत मोबाईल वापरणं, रील्स पाहणं किंवा वेब सीरीज बघणं मुलांवर चुकीचा परिणाम करू शकतं. पालकांनी स्वतः सोशल मीडियाचा वापर मर्यादित केला, तर मुलंही त्याचं अनुकरण करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT