Lipstick shade for skin tone 
lifestyle

Lipstick shade for skin tone: चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी परफेक्ट लिपस्टिक कशी निवडाल? त्वचेच्या रंगानुसार निवडा योग्य शेड

makeup tips for lips: ओठांसाठी परफेक्ट लिपस्टिक कशी निवडावी?’ असा प्रश्न अनेक महिलांना नेहमीच पडतो

पुढारी वृत्तसेवा

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी मेकअप उत्पादने आपल्या त्वचेच्या रंगानुसार निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचा रंग सावळा असो वा गोरा, त्यानुसारच तुम्हाला तुमच्यासाठी योग्य लिपस्टिक खरेदी करायला हवी.

मेकअपमध्ये लिपस्टिक हे एक अतिशय महत्त्वाचे उत्पादन आहे. त्याशिवाय तुमचा मेकअप अपूर्ण राहतो. चेहऱ्यावर योग्य मेकअप उत्पादने वापरल्यास तुमचे सौंदर्य कित्येक पटीने खुलू शकते. मात्र, चुकीची उत्पादने वापरल्यास तुमचा संपूर्ण मेकअप बिघडू देखील शकतो.

म्हणूनच, ‘ओठांसाठी परफेक्ट लिपस्टिक कशी निवडावी?’ असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. यासाठी, तुम्ही नेहमी तुमच्या त्वचेच्या रंगानुसारच लिपस्टिकचा शेड निवडायला हवा. याबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे:

गव्हाळ रंगासाठी योग्य लिपस्टिक शेड:

भारतात बहुतेक लोकांचा रंग गव्हाळ असतो. अशा वेळी तुम्ही मॉव शेड, बेरी आणि कारमेल टोनच्या लिपस्टिक शेडची निवड करावी. पेस्टल शेड लावणे टाळावे, कारण ते तुमच्या त्वचेच्या रंगानुसार योग्य दिसणार नाहीत.

सावळ्या रंगासाठी आकर्षक शेड्स:

जर तुमचा रंग सावळा असेल, तर तुम्ही ‘रियल शेड्स’ वापरून पाहाव्यात. यामुळे तुम्हाला नैसर्गिक रंग मिळेल. तुम्ही बेरी टोन शेडचाही वापर करू शकता. टेराकोटा किंवा ‘बर्न ऑरेंज’ रंगही तुमच्यावर खूप चांगला दिसेल.

गोऱ्या रंगासाठी सुंदर लिपस्टिक शेड्स:

जर तुमचा रंग गोरा असेल, तर तुम्ही कॉन्ट्रास्ट रंग वापरणे टाळावे. हे रंग तुमच्या त्वचेचा नैसर्गिक रंग झाकून टाकू शकतात. त्यामुळे, लाइट कोरल शेड, सॉफ्ट पिंक आणि पीची न्यूड कलर्स तुमच्यावर अधिक चांगले दिसतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT