परफ्युम घेताना अनेकदा त्यांच्या बाटल्यांवर ‘EDT’, ‘EDP’ किंवा ‘EDC’ असं लिहिलेलं दिसतं. पण याचा अर्थ काय असतो? आणि या शब्दांनी परफ्युमच्या गंध आणि टिकाऊपणावर काय परिणाम होतो? याची माहिती फार थोड्या लोकांना असते. चला तर मग जाणून घेऊया EDT, EDP आणि EDC म्हणजे नेमकं काय.
ही तीनही संज्ञा फ्रेंच भाषेतील आहेत आणि त्या परफ्युममधील "सेंट कॉन्संट्रेशन" (अत्तराचं प्रमाण) किती आहे, हे दर्शवतात.
कॉन्संट्रेशन: सुमारे 2% ते 5%
सुगंध टिकण्याचा कालावधी: 2 ते 3 तास
वैशिष्ट्य: हलकं आणि फ्रेश सुगंध, उन्हाळ्यासाठी उत्तम.
उदाहरण: स्पोर्ट्स परफ्युम्स, बॉडी स्प्लॅशेस.
कॉन्संट्रेशन: 5% ते 15%
सुगंध टिकण्याचा कालावधी: 3 ते 5 तास
वैशिष्ट्य: दररोज वापरण्यास योग्य, किंमतही तुलनेत कमी.
उदाहरण: ऑफिस किंवा कॉलेजसाठी वापरण्यात येणारे हलके परफ्युम्स.
कॉन्संट्रेशन: 15% ते 20%
सुगंध टिकण्याचा कालावधी: 6 ते 8 तास किंवा अधिक
वैशिष्ट्य: गडद, खोल आणि दीर्घकाळ टिकणारा सुगंध. खास प्रसंगांसाठी उत्तम.
उदाहरण: पार्टी, डेट नाईट किंवा समारंभासाठी वापरण्यात येणारे परफ्युम्स.
उन्हाळ्यात आणि दिवसा: EDC किंवा EDT हे चांगले पर्याय असतात.
हिवाळ्यात आणि रात्री: EDP हा जास्त काळ टिकणारा आणि प्रभावी पर्याय आहे.
दररोज वापरासाठी: EDT योग्य आणि किफायतशीर निवड.
स्पेशल प्रसंगासाठी: EDP सुगंधाने प्रभाव टाकतो.
परफ्युम खरेदी करताना त्याच्या सुगंधाइतकंच त्यातील EDT, EDP किंवा EDC याचा विचार करणंही गरजेचं आहे. हे टॅग्स तुम्हाला परफ्युम किती वेळ टिकेल आणि त्याचा सुगंध किती प्रभावी असेल, हे समजण्यास मदत करतात.