हिवाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हात बसणे कोणालाही आवडते. ही एक रिलॅक्सिंग थेरपी असल्यासारखे वाटते. मात्र, जास्त वेळ उन्हात बसल्या ने तुमच्या त्वचेवर टॅनिंग आणि सनबर्न होण्याचा धोका असतो. विशेषतः, चेहऱ्यानंतर उन्हाचा थेट परिणाम आपल्या हातांवर दिसून येतो. टॅनिंगमुळे तुमचे हात काळे आणि निर्जीव दिसू शकतात. अशावेळी, तुम्ही काही खास पद्धती वापरून कॉफीचा वापर केल्यास हातांवरील काळेपणा सहज दूर करू शकता.
कॉफी पावडरला त्वचेचा बेस्ट क्लींजिंग एजंट मानले जाते. कॉफीमध्ये नैसर्गिकरित्या एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेवरील मृत पेशी प्रभावीपणे काढल्या जातात आणि रक्तभिसरण सुधारते.
तुम्ही घरी तयार केलेला कॉफीचा स्क्रब वापरल्यास, तुम्हाला खालील फायदे मिळतील:
टॅनिंगपासून मुक्ती: कॉफी स्क्रब टॅनिंगची समस्या दूर करतो.
काळेपणा कमी: त्वचेचा काळेपणा दूर करून हातांच्या रंगात सुधारणा होते.
त्वचा होते नितळ: कॉफीमुळे त्वचेतील घाण साफ होऊन त्वचा उजळण्यास मदत होते.
हातांची त्वचा निखरी आणि सुंदर बनवण्यासाठी तुम्ही कॉफीचा स्क्रब सहज घरी तयार करू शकता:
1. कॉफी आणि साखरेचा स्क्रब
साहित्य: 1 चमचा कॉफी पावडर, 1 चमचा साखर, आणि थोडे गुलाब पाणी किंवा नारळ तेल
कृती: हे सर्व साहित्य एका वाटीत मिसळून पेस्ट तयार करा.
वापर: ही पेस्ट हातांवर हळूवार गोलाकार दिशेने मसाज करत लावा. साखर नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. 10 मिनिटांनंतर थंड पाण्याने हात धुवून घ्या.
2. कॉफी आणि दही/मधाचा स्क्रब:
त्वचा कोरडी असल्यास: कॉफी पावडरमध्ये दही किंवा दूध/साय आणि थोडा मध मिसळा. मधामुळे त्वचा मॉइश्चराईज राहते.
वापर: या मिश्रणाने 15 मिनिटे मसाज करा आणि पाण्याने धुवा.
या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या हातांच्या त्वचेची काळजी घेऊ शकता आणि त्यांना टॅन फ्री बनवू शकता.