कपड्यांनी भरलेले कपाट असूनही 'आज काय घालू?' हा प्रश्न अनेक महिलांना रोज सकाळी सतावतो. या गोंधळात अनेकदा आपल्याला उशीरही होतो. जर तुम्हीही रोजच्या या समस्येशी झगडत असाल, तर 'सेव्हन आउटफिट रूल' तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे.
या फॅशन हॅकच्या मदतीने तुम्ही खूप कमी कपड्यांमध्येही संपूर्ण आठवड्यासाठी (७ दिवस) वेगवेगळे आणि स्टायलिश लुक्स तयार करू शकता. ही ट्रिक तुमचा सकाळचा वेळ तर वाचवेलच, पण दररोज एक फ्रेश आणि कॉन्फिडेंट लुक देईल.
या नियमानुसार, तुम्ही किमान कपड्यांचा वापर करून सात दिवसांसाठी सात वेगवेगळे लुक्स तयार करू शकता.
यासाठी एक साधे गणित आहे:
3 टॉप्स
2 बॉटम्स (जीन्स / ट्राउझर / स्कर्ट)
2 आउटर लेयर्स (ब्लेजर / जॅकेट)
एकूण = 7 आयटम्स
या 7 वस्तूंना मिक्स अँड मॅच करून तुम्ही सात दिवस कोणत्याही कपड्याची पुनरावृत्ती न करता दररोज एक नवीन कॉम्बिनेशन तयार करू शकता.
वेळेची बचत: रोज सकाळी 'काय घालू' याचा विचार करण्यात तुमचा वेळ वाया जाणार नाही.
वॉर्डरोब राहील मोकळा: कपाट कपड्यांनी भरलेले राहणार नाही आणि ते क्लटर-फ्री राहील.
प्रवास होईल सोपा: प्रवासाच्या वेळी बॅग पॅक करणे सोपे होते, कारण तुम्हाला कमी कपडे घ्यावे लागतील.
आत्मविश्वास: दररोज एक नवा लुक मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो.
खर्च कमी: कपड्यांवर अनावश्यक खर्च करण्याची गरज पडत नाही.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कपड्यांच्या ढिगाऱ्याकडे पाहून 'घालण्यासारखं काहीच नाही' असा विचार कराल, तेव्हा हा 7 आउटफिट रूल नक्की आठवा. थोडा स्मार्ट विचार करून तुम्ही कमी कपड्यांमध्येही संपूर्ण आठवडाभर फॅशन आयकॉन बनू शकता!