Latest

आधारकार्ड हरवल्यास दोन मिनिटात नवीन तयार करता येईल ! जाणून घ्या कशी आहे प्रक्रिया

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईल डेस्‍क : आधार कार्ड जर हरवले तर आता काळजी करण्याची कोणतेही गरज नाही, कारण आता त्याची दुसरी प्रत मिळेल. आणि तीही सरकारी कार्यालयात न जाता. आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. ही प्रक्रिया आपल्‍या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने ऑनलाइन प्रक्रियेच्या मदतीने करू शकता.

कसा करायचा आधार कार्डसाठी 'ऑनलाइन' अर्ज

  • सर्व प्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/retrieve-eid-uid  या लिंकला भेट द्या
  • त्‍यानंतर आधार क्रमांक निवडा
  • पूर्ण नाव टाईप करा
  • आधारकार्डला लिंक असलेला फोन नंबर त्‍यामध्ये टाका
  • तुम्‍ही मोबाइल नंबर ऐवजी ईमेल आयडी देखील वापरू शकता
  • यानंतर लिंक असलेल्‍या मोबाईल नंबरला ओटीपी येईल
  • आणि मेल आयडीवर OTP येईल
  • OTP प्रविष्ट केल्‍यानंतर सबमिट करा.
  • त्‍यानंतर 12 अंकी आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबरवर SMS द्वारे येईल

असा करा 'ई-आधार'चा अर्ज

  • अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्‍यानंतर 12-अंकी आधार कार्ड क्रमांक टाका.
  • कॅप्चा कोड भरल्‍यांनतर OTP पाठवा.
  • Verify & Download वर क्लिक करा
  • यानंतर नवीन तयार केलेले ई-आधार डाउनलोड होईल.

हे ही वाचलं का  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT