Latest

शेरशाह : सिद्धार्थ मल्होत्रा याचा सर्वाधिक फॅन-रेटेड चित्रपट

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सिद्धार्थ मल्होत्रा याचा ॲमेझॉन ओरिजिनल चित्रपट 'शेरशाह'ने प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवल्यानंतर अधिकृतपणे मोठ्या लीगमध्ये प्रवेश केला आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओवरील हा बायोलॉजिकल युद्धपट IMDb वर सिद्धार्थ मल्होत्रा याचा सर्वाधिक फॅन-रेटेड चित्रपट बनला आहे.

अधिक वाचा-

त्याचे युजर्स रेटिंग 10 पैकी 8.9 असून 64 हजार IMDb युजर्सनी त्यासाठी मतदान केले आहे. या आठवड्याच्या IMDbPro मूव्हीमीटर चार्टवर हा चित्रपट जागतिक स्तरावर #10 वर ट्रेंड करत आहे.

ज्यामध्ये सर्वात लोकप्रिय चित्रपटांचा क्रमांक लागतो आणि जगभरातील लाखो IMDb ग्राहकांच्या पेज व्ह्यूजवर IMDbPro डेटाद्वारे निर्धारित केला जातो.

अधिक वाचा-

धर्मा प्रोडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता म्हणाले- चित्रपटाला सर्व बाजूंनी मिळालेले प्रेम पाहून आम्ही रोमांचित झालो आहोत. शेरशाह हा खरोखरच एक खास चित्रपट आणि कथा आहे, जी जगाने पाहण्याची गरज आहे.

अधिक वाचा-

चित्रपटाचे IMDb रेटिंग हे प्रेक्षकांचे मिळत असलेले कौतुक आहे. सिद्धार्थ आणि कियारा आडवाणी यांची मेहनत आहे.

दिग्दर्शक विष्णू वर्धन यांची दूरदृष्टी, सहनिर्माते काश एंटरटेनमेंट, टीमचे कष्ट आहेत. श्री बत्रा यांच्या कुटुंबाने आम्हाला त्यांची कथा सांगण्याची संधी दिली. त्यांचे आम्ही मनापासून आभार.

कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांची कथा आणि त्यांच्या शौर्य सर्वांना समजले. त्यागाची अमर कथा जगासमोर आणण्यासाठी मदत केल्याबद्दल अमेझॉन प्राईम व्हिडिओचे आभार.

शेरशाह

यामिनी पाटोडिया म्हणाल्या …

आयएमडीबी इंडियाच्या प्रमुख यामिनी पाटोडिया म्हणाल्या. चाहते त्यांचे आवडते तारे, चित्रपट, वेब सीरिजची माहिती आयएमडीबीवर शोधतात. त्यांची आवड शेअर करतात. चित्रपट चार्ट चित्रपटासाठी प्रेक्षकांचा उत्साह दाखवतो.

विष्णू वर्धन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शेरशाह कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांच्या जीवनापासून प्रेरित आहे. शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा यांच्या भूमिका आहेत.

तसेच निकितिन धीर, अनिल चरणजीत, साहिल वैद, सिद्धार्थ आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

शताफ फिगर आणि पवन चोप्रा यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अमेझॉन ओरिजिनल चित्रपट 'शेरशाह' धर्मा प्रोडक्शन आणि काश एंटरटेनमेंट यांची संयुक्त निर्मिती आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होत आहे.

पाहा व्हिडिओ-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT