मुंबई, वृत्तसंस्था : भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल याने आपली नवी हेअर स्टाईल केली आहे आणि हेअर स्टाईलसाठी त्याने तब्बल 18 हजार रुपये मोजले आहेत. या भारतीय क्रिकेटपटूने प्रसिद्ध हेअरकट सलून अलीम हकीम इथून हा तब्बल 18 हजारांचा हेअरकट केला आहे.
हा खेळाडू म्हणजे सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आहे. हा क्रिकेटपटू सध्या मुंबईत आहे, तो श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 संघाचा भागही आहे. पहिला सामना मुंबईतच होणार असून संघात सामील होण्यापूर्वी, गिल प्रसिद्ध हेअरकट सलून अलीम हकीम इथे गेला होता. तिथे त्याने नवीन हेअरकट केला. गिलच्या नवीन हेअरस्टाईलचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत अलीम हकीमने लिहिले – 2022 मधील हे माझे शेवटचे कटिंग आहे.
अलीम हकीम सलून खूप प्रसिद्ध आहे हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. बॉलीवूड जगतातील कलाकारांसोबतच अनेक भारतीय क्रिकेटपटू त्यांच्याकडून केस कापून घेतात. यामध्ये हार्दिक पंड्या, एम.एस. धोनी, विराट कोहली आदींच्या नावांचाही समावेश आहे.
हेही वाचा…