Latest

शाहू कारखान्याच्या अध्यक्षपदी सुहासिनीदेवी घाटगे यांची बिनविरोध निवड

अमृता चौगुले

कागल; पुढारी वृत्तसेवा : देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना असा नावलौकिक असलेल्या येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी श्रीमंत सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे तर व उपाध्यक्षपदी अमरसिंह घोरपडे यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी पार पडल्या.

अध्यक्ष पदासाठी श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे यांचे नाव ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी उर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांनी सुचविले तर संचालक डॉ. धनंजय पाटील यांनी त्यास अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी अमरसिंह घोरपडे यांचे नाव संचालक यशवंत ज. माने सुचविले. तर संचालक सचिन मगदूम यांनी अनुमोदन दिले. या बिनविरोध निवडीनंतर नूतन अध्यक्षा व उपाध्यक्ष यांचे निवडणूक अधिकारी यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कारखान्याच्या बोर्ड हॉल मध्ये पार पडलेल्या या बैठकीस संचालक युवराज पाटील, शिवाजीराव पाटील, प्रा.सुनिल मगदूम, सतिश पाटील, संजय नरके, सौ. रेखाताई पाटील, सौ. सुजाता तोरस्कर, भाऊसाहेब कांबळे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.
या निवडीनंतर नूतन अध्यक्षा आणि उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT