Latest

शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

नंदू लटके

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन : राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यापूर्वी महाराष्‍ट्रामध्‍ये सरकार स्‍थापन हाेण्‍यापूवी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट झाली हाेती.  यानंतर दाेन्‍ही नेत्‍यांमध्‍ये प्रदीर्घ चर्चा झाल्‍याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

अधिक वाचा :

शरद पवार यांनी पंतप्रधान कार्यालयात जावून नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्‍ही नेत्‍यांमध्‍ये विविध मुद्‍यांवर सुमारे एक तास चर्चा झाली.

नवे सहकार मंत्रालय, बँकिंग क्षेत्रांसंदर्भात यावेळी सखोल चर्चा झाल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या
नेत्‍यांवर ईडीकडून होणार्‍या कारवाईबाबतही चर्चा झाली असावी, असे मानले जात आहे.

भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी शरद पवारांची भेट घेतली होती. यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही पवारांची भेट घेतली होती. यानंतर दुसर्‍याच दिवशी पवारांनी पंतप्रधान मोदींची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयातील भेटी या प्रशासकीय मुद्‍यांवर चर्चा होते. येथे खासगी किंवा राजकीय चर्चा होत नाही. त्‍यामुळे पवारांनी मोदींबरोबर नवीन सहकार मंत्रालयाची कार्यपद्‍धती आणि बँकिंग क्षेत्रावर चर्चा झाल्‍याचे मानले जात आहे.

यापूर्वी महाराष्‍ट्रामध्‍ये सरकार स्‍थापन हाेण्‍यापूवी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट घेतली हाेती.  यानंतर प्रथमच प्रदीर्घ चर्चा झाल्‍याने राजकीय वर्तुळात चर्चा झाल्‍याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

SCROLL FOR NEXT