Latest

रजत बेदी याच्या कारची एकाला धडक, जखमी ‘आयसीयू’त

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : चित्रपट 'कोई मिल गया' फेम अभिनेता रजत बेदी याने एकाला धडक दिली. रजत बेदी याच्या कारने अंधेरीत एका व्यक्तीला धडक दिली. या अपघातात तो व्यक्ती जखमी झाला आहे.

या प्रकारानंतर डीएन नगर पोलिस ठाण्यात केस दाखल करण्यात आली आहे. जखमी व्यक्तीला उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आले आहे.

डीएन नगर पोलिसांनी म्हटले आहे, "बेदीच्या कारने टक्कर मारली. त्यानंतर रजतने स्वत: त्या व्यक्तीला कूपर रुग्णालयात आणले.  त्या व्यक्तीला त्याच्या कारसे धडक दिलीय. जखमी व्यक्ती सध्या रुग्णालयात आहे."

रिपोर्ट्सनुसार, त्या व्यक्तीला जखमीला बेदीच्या कारने टक्कर मारली. त्या व्यक्तीचे वय ३९ आहे. तो डीएन नगर भागात राहणारा आहे.

सोमवारी तो कामावरून परतत होता. तेव्हा अचानक कारने धडक दिली. त्यानंतर तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. जखमी आयसीयूत असल्याचे समजतेय. रजत जखमी व्यक्तीच्या कुटुंबाशीदेखील भेटला. त्याने पूर्ण मदत करण्याची ग्‍वाही दिली आहे.

हेही वाचलं का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT