पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरड्या मातीवर पावसाचे थेंब पडतात अन् संपूर्ण परिसर सुगंधमय होऊन जातो. तो सुगंध हवाहवासा वाटतो. कुठून येतो हा मृदगंध… निसर्ग जादू का? मग, तो मातीचा सुगंध पावसाचे थेंब पडल्यानंतर कसा निर्माण होतो? त्याच्या मागे कोणतं सायन्स आहे? या इन्टरेस्टिंग प्रश्नांचं उत्तर जाणून घेऊ…
पहिल्या पावसात मातीचा सुगंध येण्याचे पहिले कारण…
तर मित्रांनो! आपल्याला माती वरून कोरडी दिसत असते. पण, माती आतून ती ओलीच असते. आता ओलेपणा असल्यावर त्यात कित्येक जीवाणू वास करत असणार नाही का? याच जिवाणुंमध्ये 'असिनोमायसेटिस' नावाचा जीवाणू असतो.
आता हा जीवाणू जमिनीत वेटोळे करून जमिनीत राहतो. जेव्हा पाऊस नसतो आणि जमीन वाळलेली असते तेव्हा हा जीवाणू मातीचे कवच (स्पोअर्स) स्वतःभोवती तयार करून राहतो. पहिला पाऊस पडला की, ते मातीचे कवच हवेत उधळतात.
अगोदर उन्हाने तापलेल्या मातीवर पाऊस पडला की, पाण्याती बाष्फ एरसोलसारखे काम करायला लागतात. हे एरसोल आपल्या नाकापर्यंत पोहोचतात. त्यातूनच भिजलेल्या मातीचा सुगंध म्हणजेच मृदगंध आपल्याला सुखावून जातो.
असिनोमायसेटिस हा जीवाणू जगात सगळीकडे आढळतो. सहाजिकच पहिल्या पावसात जगभरात मातीचा सुगंध येतो. हा जीवाणू ओलसर भागात वाढतो. तर पहिल्या पावसात मातीचा सुंगध येणास असिनोमायसेटिस नावाचा जीवाणू आहे.
पहिल्या पावसात मातीचा सुगंध येण्याचे इतरं कारणं…
पाऊस ज्यावेळी आकाशातून खाली पडत असतो त्यावेळी वातावरणातील अनेक रसायने त्यामध्ये मिसळतात. त्याचा परिणाम असा होतो की, पावसाचं पाणी आम्लधर्मी होतं. तेच पाणी मातीवर पडतं, अभिक्रिया घडून येते. त्यातून आपलाला सुगंध येतो.
काही वैज्ञानिकांच्या मते, वनस्पतींमधून तेलकट पदार्थ सोडले जातात. त्यामध्येही काही जीवाणू उपस्थित असतात. त्या जीवाणुंमधून काही रसायने बाहेर पडतात. हे जीवाणू जेव्हा पहिल्या पावसाच्या थेंबांच्या संपर्कात येतात. तेव्हा त्यांची अभिक्रिया होते.
त्यानंतर ते जीवाणू पुन्हा जमिनीवर पडतात. तेच जीवाणू पन्हा हवेच्या बुळबुळ्यांमध्ये रुपांतरित होतात. हे बुळबुळे हवेत पसरतात. नंतर ते फुटतात. त्याचे बारीक कण होतात. त्या कणांना एरसोल म्हणतात. त्यातूनही मृदगंध पसरतो. तो सुंगध आपलं आपलं मन प्रसन्न करतो.
हे वाचलंत का?