Latest

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार : संभाजीराजे

Shambhuraj Pachindre

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना आरक्षणाचा विषय माहीत आहे. उद्याच त्यांना भेटून मराठा आरक्षणा संदर्भात बैठक लावून आरक्षण मिळवण्यासाठीचा मार्ग काढू. भांबेरीमध्ये आपल्याला भेटायला यावंच लागेल, या दृष्टीने मी नियोजन करतो, असे आश्वासन संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी दिले. मराठा आरक्षणासाठीच्या भांबेरी येथे सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषण ठिकाणी उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी ते आले होते. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. उपोषणाला बसलेल्या ९२ वर्षीय वृद्धांना उपोषण सोडण्याची विनंती केली. यादरम्यान संभाजीराजेंच्या हातून पाणी पिऊन ९२ वर्षीय वृद्ध पंडीतराव कनके यांनी उपोषण सोडले. काल आमरण उपोषणाचा दुसरा दिवस होता.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडवणीसांच्या काळातच मराठा आरक्षण मिळाल होतं. जे आरक्षण टिकेल तेच आरक्षण आम्हाला पाहिजे. मराठा समाजावर अन्याय झाला आहे. आपल्या आरक्षण मिळवायचं असेल तर सामाजिक मागास सिद्ध करावं लागेल. विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी स्वराज्य संघटना स्थापन केली आहे. जिथे अन्याय होतो, त्यासाठी ही संघटना काम करणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT