Latest

मंत्रालयात ‘भारत माता की जय’चा नारा

Shambhuraj Pachindre

मुंबई पुढारी वृत्तसेवा : आज मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात 'हर घर तिरंगा' अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत तिरंग्यासह सेल्फी काढून घेण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. मंत्रालयातील अधिकारी तसेच समस्त कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना अक्षरशः जणू घेरावच टाकला होता. प्रत्येकाला मुख्यमंत्र्यांसमवेत तिरंगा ध्वज घेऊन सेल्फी काढायची होती. मुख्यमंत्री देखील सर्वांच्या इच्छेला मान देत, प्रत्येकाजवळ थांबत सेल्फी काढत होते. यावेळी त्रिमूर्ती प्रांगणातले सगळे वातावरण तिरंगामय झाले होते. 'भारत माता की जय' आणि 'जय हिंद' अशा घोषणांनी मंत्रालय दणाणून गेले होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT