Latest

भारतीय संशोधकांनी बनवला विषाणू-जीवाणुनाशक मास्क

Shambhuraj Pachindre

हैदराबाद : भारतीय संशोधकांनी 'कोव्हिड-19' विरुद्धच्या मोहिमेत आता विषाणू-जीवाणुनाशक मास्क बनवला आहे. हा कॉपर आधारित नॅनोपार्टिकल-कोटेड, अँटिव्हायरल फेस मास्क 'कोव्हिड-19'ला कारणीभूत होणार्‍या कोरोना विषाणूला रोखण्याबरोबरच अन्यही अनेक व्हायरल व बॅक्टेरियल संक्रमणांविरुद्ध प्रभावी असल्याचे आढळले आहे.

सध्याचे प्रचलित फेस मास्क हे विषाणूला नष्ट करीत नाहीत तर त्यांना केवळ फिल्टर करतात. मास्क नीट परिधान केला नाही किंवा त्यांची चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लावली नाही तर संक्रमणाचा धोकाही कायम राहतो. मात्र, हा स्वतःच अशा विषाणू-जीवाणूंना नष्ट करणारा मास्क हा धोका कमी करतो.

पारंपरिक मास्क एकदाच वापरण्यास योग्य असतात तसेच ते नैसर्गिकरीत्या नष्ट होत नाहीत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते व कचर्‍याचा प्रश्न निर्माण होतो. हे नवे अँटिव्हायरल मास्क सूती कापडापासून बनवलेले आहेत जे नैसर्गिकरीत्या नष्ट होऊ शकतात. वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी (सीसीएमबी) आणि बंगळूरमधील रेसिल केमिकल्स या कंपनीच्या सहकार्याने भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (डीएसटी)ची एक स्वायत्त संस्था 'इंटरनॅशनल अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स (एआरसीआय) च्या वैज्ञानिकांनी हा मास्क विकसित केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT