Latest

बिग बॉसचा ‘भांडखोर प्रतिस्पर्धी’ सिध्दार्थ शुक्ला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : अभिनेता सिध्दार्थ शुक्ला काळाच्या पडद्याआड गेला. त्याची अचानक झालेली एक्झिट ही टीव्ही इंडस्ट्रीला धक्‍का बसला आहे.  सिध्दार्थ शुक्ला बिग बॉसच्या १३ व्या सीझनचा विजेता होता. पण, सिध्दार्थने बिग बॉसचा अख्खा शो गाजवला होता. शोमधील अनेक स्पर्धकासोबत त्याचे वाद व्हायचे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील 'भांडखोर प्रतिस्पर्धी' म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती.

मुंबईमध्ये १२ डिसेंबर, १९८० जन्मलेल्या सिद्धार्थने अभिनयात यायचं ठरवलं होतं. आपल्या करिअरच्या सुरुवातीला एक मॉडल म्हणून काम केलं होतं. २००४ मध्ये त्याने टीव्हीतून डेब्यू केला होता. २००८ मध्ये त्याने बाबुल का आंगन छूटे ना नावाच्या टीव्ही मालिकेतून काम केले होते. परंतु, खरी ओळख त्याला बालिका वधू मालिकेतून मिळाली होती. या मालिकेतून घराघरात तो पोहोचला.

भांडखोर सिध्दार्थ

बिग बॉसमध्ये सर्वात भांडखोर कंटेस्टेंट्सचा टॅग सिध्दार्थला देण्यात आला होता. बिग बॉसच्या शोमध्ये सिध्दार्थ चर्चेत राहिला होता. त्याचा बिग बॉसमधील स्पर्धकांसोबत तो भांडण करायचा. म्हणून प्रेक्षकांनी त्याला बांडकोर प्रतिस्पर्धी म्हणून टॅग दिलं होतं.

बिग बॉस -१३ मध्ये सिद्धार्थने रश्मी देसाई, असीम रियाज, पारस छाबड़ा आणि इतर स्पर्धकांसोबत भांडण केलं होतं. मारामारी ते बिग बॉसमधील प्रॉपर्टीचे नुकसानदेखील त्याने केले होते. सिद्धार्थने त्यावेळी शोमध्ये सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.

कूपर रुग्णालयात निधन

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार- सिद्धार्थचा मृतदेह सध्या मुंबईतील कूपर रुग्णालयात आहे.

शवविच्छेदनदेखील तेथेचं केलं जाईल.

रुग्णालयाने पुष्टी केली आहे की, सिद्धार्थचा मृत्यू हार्ट ॲटॅकने झाला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेता सिद्धार्थने रात्री झोपण्यापूर्वी काहीतरी औषधे घेतली होती. परंतु, तो त्यानंतर उठला नाही. त्याने कोणती औषधे घेतली होती, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT