Latest

बाळ गर्भातच ओळखते आईचा आवाज, स्पर्श

backup backup

न्यूयॉर्क : नवजात बाळाला आईचा स्पर्श चटकन समजतो. ते आईचा आवाजही ओळखते. इतक्या लहान बाळाला हे कसं काय शक्य होतं, याचे आपल्याला आश्चर्य वाटत असते. मात्र, बाळाने आईची ओळख तिच्या गर्भात असतानाच करून घेतलेली असते. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

संशोधकांनी म्हटले आहे की बाळामधील हे गुण ते गर्भात असतानाच विकसित होऊ लागतात. गर्भात असतानाही त्याला आईचा आवाज ऐकू येतो. गर्भात असतानाच कालांतराने ते आवाज स्पष्टपणे ओळखू लागतं. नैसर्गिकरीत्याच आई आणि बाळामध्ये एक 'बाँडिंग' तयार झालेले असते. त्यामुळेच बाळाला आईजवळ राहणे आवडते. नवजात मुलांमध्ये हे ओळखण्याचीही क्षमता असते की त्याची आईच स्तनपान करवत आहे की दुसरीच कुणी महिला आहे.

गर्भाशयात वाढत असताना बाळ एका थैलीत असते. त्याभोवती द्रव भरलेला असतो व त्याला 'अ‍ॅम्नीओटिक द्रव' असे म्हटले जाते. यामधूनच बाळाला पोषक घटक मिळत असतात. या द्रवाला एक वैशिष्ट्यपूर्ण वास असतो. हा वास स्तनपानाच्या वेळी आईला येतो. ज्यावेळी बाळ जन्मल्यानंतर लगेच रडतं आणि आई त्याला कुशीत घेते, स्तनपान करते त्यावेळी ते शांत होते. याचे कारण बाळाला स्तनपान करीत असताना तो वास जाणवतो. त्यावरूनच आपल्याच आईने आपल्याला घेतलं आहे हे ते ओळखते. स्कॉडलंडमधील डूंडी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटले आहे की गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यापासून बाळाला आईचा पोटावरील स्पर्श समजू लागतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT