Latest

पुणे : दाभोलकरांच्या छाती, मेंदूतून गोळ्या बाहेर काढल्या

मोनिका क्षीरसागर

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करणारे ससूनचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांची साक्ष व उलट तपासणी बुधवारी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात नोंदविण्यात आली.

शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत डॉ. दाभोलकर यांच्या मेंदू आणि छातीतून दोन गोळ्या बाहेर काढल्याचे डॉ. तावरेंनी न्यायालयाला सांगितले.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांविरोधात खटल्याची सुनावणी सुरू आहे.

डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृतदेहाचे विच्छेदन ससूनचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. हरीश ताटिया आणि डॉ. मनोज शिंदे यांनी केले होते.

हेही वाचलत का ?

SCROLL FOR NEXT