Latest

दिशा सालियान प्रकरणी राणे पिता- पुत्र मालवाणी पोलिस ठाण्यात हजर

backup backup

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मालवाणी पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणित्यांचे पुत्र निलेश राणे हे आज चौकशीसाठी हजर झाले. दिशा सालियान हिच्या मृत्यूबाबत चुकीचे विधान करत बदनामी केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना समन्स बजावण्यात आले होते.

राणे पिता पुत्राच्या प्रतीक्षेत मालवाणीमध्ये पोलीस आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मालवाणी पोलीस ठाण्यात नारायण राणे आणि निलेश राणे दाखल झाल्यावर भाजप कार्यकर्ते आणि राणे समर्थकांनी घोषणाबाजी केली यावेळी पोलिसांची कार्यकर्त्यांची शाब्दिक चकमक झाली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूबाबत चुकीचे विधान करत बदनामी केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना समन्स बजावण्यात आले होते.

या प्रकरणी त्यांना मालवाणी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. राणे पिता पुत्रांनी न्यायालयात आज (दि. ०५) तारखेपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी करत ते चौकशीला हजर राहिले नव्हते.

दिशा सालियान हिची आई वासंती (५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. याच गुन्ह्यात चौकशीसाठी दोघांनाही समन्स बजावण्यात आले आहे. आज ५ मार्च दुपारी १ वाजता हजर राहणार असल्याचे सांगितले होते. दाखल गुन्ह्याविरुध्द ते न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.

SCROLL FOR NEXT