Latest

crime news : दाखवली २० वर्षांची तरुणी, पण लग्नात हजर केली ४५ वयाची महिला

Arun Patil

लखनऊ ; पुढारी ऑनलाईन : ( crime news )आपण कोयला चित्रपटांमध्ये पाहिले असेल. त्यामध्ये असा एक सिन आहे. ज्यात माधुरी दिक्षीतला लग्नासाठी शाहरूख खानचा फोटो दाखवण्यात येतो. मात्र लग्नांच्या मंडपात म्हातारा असणाऱ्या अमरीश पुरीला मांडवात उभे केले जाते. आणि त्याच्याबरोबर लग्नही लावून दिले जाते. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातमधील इटावा शहरात राहणाऱ्या एका तरुणासोबत घडला आहे. त्या तरूणाला मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीने लग्ना अगोदर २० वर्षीय तरुणीशी भेट घालून दिली. यानंतर त्याचं लग्न ठरवलं. आणि लग्नाच्या वेळी मात्र त्या तरूणासमोर चक्क एका ४५ वर्षांच्या महिलेला उभं केलं. या मांडवात उभ्या केलेल्या महिलेला दोन मुलंही असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनूसार, शत्रुघ्न सिंह नावाच्या व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे. शत्रुघ्न सिंह याला एका मध्यस्थीने एका तरूणीची लग्नासाठी भेट घडवून आणली. त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं. त्यानंतर त्यांचे लग्न ठरविले. विशेष म्हणचे त्या तरूणाकडून मध्यस्थीने 35 हजार रुपये अॅडव्हान्सही घेतला. यानंतर थेट लग्नाच्या दिवशी जेव्हा तरुण मंडपात पोहोचला, त्यावेळी त्या तरूणाला समजलं की, आपलं लग्न दोन मुलांची आई असणाऱ्या एका महिलेसोबत लावलं जात आहे. त्यामुळे नाराज झालेल्या त्या तरूणाने लग्न करण्यास नकार दिला. याबाबतचं एका वृत्त प्रसिद्ध वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. (crime news )

ही फसवणूक झालेली पाहून शत्रुघ्न आणि त्याची आई पोलिसांना बोलवण्याचा विचार करत होती. मात्र या घटनेनंतर मध्यस्थांनी शत्रुघ्नवरच हल्ला केला. मध्यस्थी त्याला माण्यासाठी धावत होता. पण त्याच्यापासून आपली सुटका करून घेत पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला. त्याने पोलिस ठाण्यामध्ये घडलेला पक्रार पोलिसांना सांगितला.

त्याने पोलिसांना सांगितले की, गावातील दोन मध्यस्थांनी आपली फसवणूक केली. आपल्याकडून त्या दोघांनी 35 हजार रुपये उकळले आहेत. असे शत्रुघ्न याने पोलिसांना सांगितले.

शत्रुघने पोलिसांना सांगितले की, या मध्यस्थांनी मंदीरामध्ये त्याची व एक तरूणीची भेट घडवून आणली. त्याने लग्नासाठी शगुन म्हणून मुलीच्या हातात एक हजार रुपये रोख आणि मिठाईचा डबाही दिला होता. यावेळी मुलीची मावशीही तिच्यासोबत आली होती. यांनतर लग्नाची बोलणीही पक्की करण्यात आली होती.

त्यानंतर मात्र लग्नात जबरदस्तीने माझे लग्न दोन मुलांची आई असलेल्या एका महिलेशी लावण्याचा प्रयत्न केला. मी हे लग्न करण्यास नकार दिला. यांनतर लग्नास नकार देताच मारून टाकण्याची धमकी देऊ लागले. त्यांनी आमच्यावर हल्लाही केला. हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर पोलिसही चक्रावले. या प्रकरणनंतर योग्य ती कायदेशीर कारवाई (crime news) करण्यात येईल,असे पोलिसांनी सांगितली.

SCROLL FOR NEXT