Latest

कोरोना : डेल्टा व्हेरियंट ४० ते ६० टक्क्यांहून अधिक संसर्गजन्य : डॉ.एन.के अरोडा

नंदू लटके

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: कोरोना डेल्टा व्हेरियंट हा अल्फा व्हेरियंटच्या तुलनेत जवळपास ४० ते ६० टक्क्यांहून अधिक संसर्गजन्य आहे. त्‍यामुळे तो वेगाने पसरू शकतो, असा दावा भारतीय सार्स-कोव्ही-२ जीनोमिक्स कंसोर्टियमचे सहअध्यक्ष डॉ.एनके अरोडा यांनी केला आहे. कोरोना डेल्टा व्हेरियंट विरोधात देशात उपलब्ध सर्व लशी प्रभावी असल्याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

अधिक वाचा 

बी.१.६१७.२ म्हणजेच डेल्टा व्हेरियंट पहिल्यांदा ऑक्टोबर २०२० मध्ये भारतात सापडला. देशात कोरोनाची दुसरी लाटेकरीता या व्हेरियंटला जबाबदार धरले जात आहे.

देशात नव्याने आढळणार्या कोरोनाबाधितांमध्ये जवळपास ८०% रूग्ण या व्हेरियंटनेग्रस्त आहेत. अल्फाच्या तुलनेत
हा व्हेरियंट जवळपास ४० ते ६० टक्क्यांहून अधिक वेगाने पसरतो. ​ब्रिटेन, अमेरिका, सिंगापूरसह ८० हून अधिक
देशात हा व्हेरियंट पसरला असल्याचे डॉ.अरोडा म्हणाले.

अधिक वाचा 

महाराष्ट्रात आढळलेला डेल्टा व्हेरियंट देशाच्या मध्य तसेच पूर्वेकडील राज्यात पोहचण्यापूर्वी पश्चिमेकडील राज्यासह उत्तरेकडील राज्यात पोहचला. डेल्टा व्हेरियंट शरीरात वेगाने वाढतो तसेच फुफ्फुसांवर अधिक सूज निर्माण करतो. आयसीएमआरकडून करण्यात आलेल्या अभ्यासानूसार देशात उपलब्ध सर्व लशी डेल्टा व्हेरियंटविरोधात प्रभावी असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ :भारत कोरोनाशी कसा लढत आहे? डॉ. रमण गंगाखेडकर | दैनिक पुढारी | आरोग्य संवाद

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT