Latest

जेम्स कॅमरूनच्या ‘अवतार-२’ चे बंपर कलेक्शन!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या अवतार या चित्रपटातील जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्सने जगभरातील प्रेक्षकांना थक्क केले होते. अवतार प्रदर्शित झाला, त्यावेळी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात तोबा गर्दी केली होती. या चित्रपटाच्या कमाईचा विक्रम अजूनही अबाधित आहे. आता १३ वर्षांनंतर या चित्रपटाला सीक्वेल 'अवतार : द वे ऑफ वॉटर' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

शुक्रवारी जेम्स कॅमरून दिग्दर्शित 'अवतार-२' हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षक- समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बॉक्स ऑफिसच्या अहवालानुसार, 'अवतार-२' ने शुक्रवारी बंपर ओपनिंग केली. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ३८ ते ४० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 'अवतार-२'ला जरी जबरदस्त ओपनिंग मिळाली असली तरी 'अॅव्हेंजर्स: एंड गेम'चा विक्रम मोडू शकला नाही. या चित्रपटाने ५३ कोटी रुपयांची कमाई केली होती.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT