भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रीत बूमराह ओवलमध्ये इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटीत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे एका स्थानाच्या फायद्यासह गोलंदाजांच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत नवव्या स्थानी झेप घेतली.
बूमराहने आपल्या रिवर्स स्विंगने ओली पोप आणि जॉनी बेअरस्टो यांना बाद करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कामिन्स अव्वल स्थानी आहे. बूमराह बरोबरच अजून एकही सामना न खेळलेला भारतीय स्पिनर आर. अश्विन दुसऱ्या स्थानी कायम आहे.
अश्विनला अजून एकही सामना खेळण्यास मिळाला नाही. शार्दुल ठाकूर दोन अर्धशतकांच्या मदतीने फलंदाजांच्या क्रमवारीत 79 व्या स्थानी पोहोचला आहे. तर गोलंदाजांच्या क्रमवारीत तो 49 व्या स्थानी पोहोचला आहे.
फलंदाजी क्रमवारीत अव्वल 10 क्रमवारीत बदल झालेला नाही. या क्रमवारीत इंग्लंडचा कर्णधार जो रूट अव्वल स्थानी कायम आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानी आहे.
अश्विन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत एका स्थानाच्या नुकसानीसह पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. तर, रविंद्र जडेजा तिसऱ्या स्थानी कायम आहे. वेस्टइंडिजचा जेसन होल्डर अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.