Latest

चिल्ड्रेन्स होम बालगृह मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, १८ मुले कोरोनाबाधित

backup backup

गोवंडी ; पुढारी वृत्तसेवा : मानखुर्दमधील चेंबूर चिल्ड्रेन्स होम बालगृह मध्ये पुन्हा एकदा कोरोनाने प्रवेश केला आहे एकूण अठरा मुलांना कोरोना ची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाग्रस्त मुलांना वाशीनाका येथील पालिकेच्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.

चिल्ड्रेन्स होम बालगृह सोसायटीअंतर्गत असलेल्या मानखुर्दमधील बालगृहामध्ये मुलांची काळजी जरी घेण्यात येत असली तरी इतकी मुले कोरोनाग्रस्त झाल्याने चिंता वाढली आहे.खरे तर या चिल्डरन्स होम मध्ये बाहेरील व्यक्तीस जाण्यास मज्जाव आहे.इथे सुरक्षा व्यवस्था ही त्यासाठी चोख असते.

मात्र मागील महिन्यात रत्नागिरी येथून एका मुलाला या बालगृहात आणण्यात आले होते. तेव्हा त्याची कोरोना चाचणी ही करण्यात आली होती.

मात्र अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर देखील त्याला गृह विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. काही दिवसानंतर त्याला दुसऱ्या बालगृहामध्ये हस्तांतरित करण्यात आले.

तिथे प्रवेश देताना पुन्हा त्याची कोरोना तपासणी करण्यात आली असता तेंव्हा त्याचा अहवाल पॉजिटीव्ह आला.

या नंतर दोन दिवसांपूर्वी बालगृहातील एका मुलाला सर्दी व एकाला अंगदुखीचा त्रास होऊ लागला.त्यामुळे तातडीने बालगृहातील एकशे पाच मुलांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी अठरा मुलांचा अहवाल कोरोना पोजिटिव्ह आला आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नसली तरी त्यांना विलगिरण कक्षात ठेवण्यात आले आहे. ही सगळी मुले १४ ते १५ वयोगटातील आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील या बाल गृहात कोरोना ने शिरकाव केला होता.आता ही अठरा मुले कोरोनाग्रस्त झाल्याने इथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाग्रस्त मुलाची तब्येत स्थिर असून त्यांना आवश्यक ते उपचार पालिकेकडून दिले जात आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT